परिश्रमाशिवाय कोणतेही यश साध्य होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:01 PM2019-01-23T23:01:47+5:302019-01-23T23:02:02+5:30
कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळविण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करण्याची गरज आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वात प्रत्येकाने नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करून परिश्रमाची तयारी ठेवावी. असे प्रतिपादन लाखनी येथील द लिटील फ्लॉवर इंग्लीश स्कूलच्या प्राचार्य कल्पना भोयर म्हणाल्या.
भंडारा : कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळविण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करण्याची गरज आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वात प्रत्येकाने नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करून परिश्रमाची तयारी ठेवावी. असे प्रतिपादन लाखनी येथील द लिटील फ्लॉवर इंग्लीश स्कूलच्या प्राचार्य कल्पना भोयर म्हणाल्या.
जीवनात प्रत्येकाला वाटते की, मी यशस्वी झालो पाहिजे. मोठे होऊन काहीतरी करता आले पाहिजे. मात्र मोठे होण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. यश हे कुठल्याही क्षेत्रात असू शकते. अधिक मार्क्स म्हणजे भरपूर टॅलेंट असे नाही. कुणाला गायनात, कुणाला वादनात तर कुणाला क्रीडा क्षेत्रात आवड असते. प्रत्येकाने आपली आवड जोपासली पाहिजे. यश कधीच अपघाताने मिळत नसते. त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द तयारी करण्याची प्रामाणिक मानसिकता आवश्यक आहे. स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांनी अष्टपैलू असणे गरजेचे आहे. संभाषण कौशल्यही तेवढेच महत्वाचे आहे. नानाविध कारणाने नवनवीन लोकांशी संबंध येतो. भेटी होतात. हे संबंध वृद्धींगत होण्यासाठी आजच्या पिढीने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य कल्पना भोयर यांनी केले.
मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. दिवस कणाकणाने मोठा होत जातो. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी दररोज नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करावा. आपले व्यक्तीमत्व अष्टपैलू घडविण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे प्राचार्य म्हणाल्या.