लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : शहापुरात अवैध दारुबंदीचे आश्वासन देऊनही आंबेडकर वॉर्ड परिसरात सर्रास दारुविक्री सुरु असल्याचे पाहून संतप्त महिलांनी या अवैध दारू अड्यावर धाड टाकून येथील दारुचे साहित्य व विक्रेत्यांना पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. परिसरात महिन्याभरापासुन महिलांनी दारू विक्रेत्या महिला व पुरूषांना अवैध दारूविक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.जवाहरनगरचे ठाणेदार अजाबराव नेवारे यांनी शहापुरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांना दारू अड्डे बंदीकरीता सुचना दिल्या होत्या. परंतु दारू विक्रेत्यांचा मनमानी कारभार सुरूच असल्याने नारी शक्तीने दारू बंदीचा निर्धार केला. आंबेडकर वार्ड, नानाजी जोशी विद्यालयाच्या मार्गावर अवैध दारू अड्यांमुळे विद्यार्थांनी व महिलांना त्रास सहन करावा लागत होता. २३ डिसेंबर रोजी सकाळी दारू विक्रेत्या महिलांच्या दोन्ही अवैध दारू अड्यावरील हातभट्टीची २० लिटर दारू महिलांनी रंगेहात पकडून पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार नेवारे यांच्या मार्गदर्शनात हवालदार जांभुळकर व प्रविण हारगुडे यांनी दारुविक्री करणाºया उज्वला गजभिये व प्रेमलता दिलीप गजभिये रा.शहापूर विरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यावेळी दोन्ही दारू विक्रेत्या महिलांकडुन सहा लिटर तर दुसºया महिलेकडून दारू जप्त केली. यावेळी ग्रा.पं.सदस्या सिमा खोब्रागडे, तंमुस अध्यक्ष अमर भुरे, पो.पा.धम्मपाल सुखदेवे, वंदना सरादे, दीक्षा वासनिक, पुष्पा बेलेकर, विमल शामकुवर सोनल गजभिये, कुंता गेडाम, ममता बेलेकर, फुलन खोब्रागडे, मुक्ता रामटेके, शालुबाई कांबळे, सुनिता तांडेकर, इंदिरा तांडेकर, हुमिता फेडर निता कळंबे, लता खोब्रागडे, मंदा भोंदे, बाया शेंडे, अनुसया कोसरे, नंदा खोब्रागडे, सकुन तांडेकर, सुप्रिया खोब्रागडे, सुमन सेलोकर महिलांनी सहभाग घेतला.
महिलांनी पकडली हातभट्टीची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:23 AM
शहापुरात अवैध दारुबंदीचे आश्वासन देऊनही आंबेडकर वॉर्ड परिसरात सर्रास दारुविक्री सुरु असल्याचे पाहून संतप्त महिलांनी या अवैध दारू अड्यावर धाड टाकून येथील दारुचे साहित्य व विक्रेत्यांना पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.
ठळक मुद्देनारीशक्ती झाली जागृत : शहापुरात अवैध दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार