महिलांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:22+5:302021-03-10T04:35:22+5:30
भंडारा तालुक्यातील बेला येथील राजीव नगरात आयोजित महिला दिनाच्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी राजकुमार कृपान, ...
भंडारा तालुक्यातील बेला येथील राजीव नगरात आयोजित महिला दिनाच्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी राजकुमार कृपान, एकनाथ भोंगाडे, तुकडोजी शेंडे, सुषमा मोहतुरे, कुंदा कृपान, सरस्वता सेलोकर, मनिषा फुंडे, सुनीता मौर्य, शीतल भोंगाडे, अर्चना दुरूगकर, अंजू पाटील, रुचिता लोखंडे, लक्ष्मी भोंगाडे, मनीषा इंगळे यांच्यासह राजीवनगर येथील महिला, पुरुष मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुषमा मोहतुरे यांनी स्त्रियांनी लग्नानंतरही आपले शिक्षण आपल्या आवडी-निवडी व आपल्या कला जोपासून त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी महिलांसाठी विशेष योगदान दिलेल्या महिलांचे दाखले दिले जागतिक महिला दिनानिमित्ताने समाजात आजही असलेली विषमता दूर करून स्त्रियांनी संघटित होऊन एकत्रित लढा देण्याचेही त्यांनी आवाहन केले. यानंतर विविध महिला व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव राजकुमार कृपान, एकनाथ भोंगाडे, तुकडोजी शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक मनिषा फुंडे यांनी केले संचालन सुषमा मोहतुरे यांनी तर आभार सरस्वता सेलोकर यांनी मानले.