उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 12:41 AM2017-02-17T00:41:08+5:302017-02-17T00:41:08+5:30

तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही.

Work on the flyover | उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने

Next

वाहतुकीची कोंडी : दिवसभर उडतो धुराळा, श्वसनाचा त्रास
तुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम कासवगतीने सुरु आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित रेल्वे विभागाने येथे अजूनपर्यंत निविदा काढली नाही. राज्य शसनाचा संबंधित विभाग मागील दीड वर्षापासून कामे करीत आहे. कामाची अशीच गती राहिली तर किमान चार वर्षे या उड्डाणपुल पूर्णत्वाला लागतील. सध्या येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.
तुमसर रोड येथे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाला मंजूरी प्राप्त झाली. रेल्वे तथा राज्य सरकार संयुक्तरित्या उडाणपूलाला निधी उपलब्ध करुन उडाणपूल पुर्णत्वाचा करार झाला. या रेल्वे फाटकावर प्रचंड वाहतूकीची कोंडी होत असल्याने केंद्र तथा राज्य शासनाने येथे उडाणपूल मंजूर केला होता.
सन २०१४ मध्ये उडाणपूलाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उडाणपुलांचे भूमिपूजन केले होते. उडाणपूलाची एकूण किंमत ४३ कोटी इतकी आहे. यात २६ कोटी राज्य शासन खर्च करणार असून १४ कोटी रेल्वे विभाग खर्च करणार आहे. राज्य शासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. दीड वर्षापासून येथे कामे सुरु आहेत. आतापर्यंत अंडरपास (भूयारी रस्ता) तयार झाला आहे. बायपास रस्ता एका बाजूचा झाला असून दुसऱ्या बाजूचा रस्ता येथे तयार केला जात आहे.
दगड रोवणीचे (पिलर फिक्सींग) कामे तुमसर-रामटेक रस्त्यावर सुरु आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या उड्डाणपुलाला प्राप्त झाले आहे. अप्रीय रस्ता (तुमसर-रामटेक मार्ग) एका महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. गोंदिया मार्गावरील देव्हाडी शिवारातील 'अ‍ॅप्रोच' रस्त्याचे कामे सुरु झाली आहेत.
रेल्वे ट्रॅकवरील सिमेंट पिल्लर उभारणी व त्यावरील स्पॅनची निविदा अजूनपर्यंत रेल्वेने काढली नाही, अशी माहिती आहे. बायपास रस्ता मुरुम, गिट्टी टाकून तयार करण्यात आला. वाहतूकीमुळे प्रचंड धुराळा येथे दिवसभर उडत असतो. आजूबाजूची घरे लालसर झाली आहेत. हवेतील कणांमुळे प्रदूषणाची समस्या येथे वाढली आहे. किमान रस्त्यावर सतत पाणी घालणे गरजेचे आहे.
तुमसर-रामटेककडे जाणाऱ्या वळणावर खोल खड्डा पडला आहे. येथे लहान चारचाकी वाहने अडून पडतात. रात्री अंधारात हा खड्डा दिसत नाही. येथे अपघाताची नेहमीच शक्यता राहते आहे. अपघात येथे घडले आहेत. अप्रिय रस्त्यावर वीज कारखान्यातील 'पोन्टी' राख घालण्यात येत आहे. हवेमुळे ही राख उडून येथून प्रवास करणाऱ्यांच्या नाका-तोंडात जाते. गावातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने येथे दखल घेणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनानेही येथे दखल घेण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींनी येथे निधी उपलब्धतेकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Work on the flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.