नगररचनाकार कार्यालयात कामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:32 PM2018-02-05T22:32:30+5:302018-02-05T22:32:49+5:30

शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या येथील नगर रचना विभागात कर्मचाऱ्यांची अर्धी पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे.

Work relation in the municipal office | नगररचनाकार कार्यालयात कामांचा खोळंबा

नगररचनाकार कार्यालयात कामांचा खोळंबा

Next
ठळक मुद्देकामे दुर्लक्षित : कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त

देवानंद नंदेश्वर ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या येथील नगर रचना विभागात कर्मचाऱ्यांची अर्धी पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सर्वसामान्य नागरिक याच कार्यालयात धाव घेत असून अपुºया कर्मचाºयांमुळे कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढला आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरणात वाढ होत आहे. शहरीकरणामध्ये नगर विकास विभाग महत्वाचा मानला जातो. शहरी भागातील वाहतूक, घरांची समस्या, घनकचरा व्यवस्थापन या नागरी भागाच्या विकासाशी निगडीत असलेल्या नगर विकास विभागाला अनन्यसाधारण महत्व आहे.
भंडारा नगर रचना विभागात एकूण १३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांमध्ये सहाय्यक नगर रचनाकार १, वरिष्ठ लिपीक १, अनुरेखक २, दफ्तरबंद १, शिपाई १ या पदांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात प्रादेशिक विकास योजना लागू होत असून या विभागातील कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संपूर्ण जिल्ह्याचा भार या कार्यालयावर आला असून कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
सदर प्रतिनिधीने सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास नगर रचनाकार कार्यालयात फेरफटका मारला असता या कार्यालयात केवळ दोन कर्मचारी उपस्थित दिसले.
या कार्यालयाची धुरा सांभाळणारे नगर रचनाकार अधिकारी संजय खापर्डे हे कक्षात उपस्थित नव्हते. तर सहायक नगर रचनाकार भाग्यश्री बोरकर या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेले असल्याचे सांगण्यात आले. येथील बहुतांश खुर्च्या कर्मचारी अभावी रिकाम्या दिसून असल्याचे आढळून आले.
कार्यालयाला शासकीय वाहन नाही
नगर विकास विभागाचे मंत्री खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहराच्या विकासावर त्यांचा अधिक भर आहे. कालच रविवारला त्यांनी भंडारा व तुमसर शहरासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा केली. परंतु, शहर विकासात मोलाची भूमिका बजावणारा भंडारा येथील नगर विकास विभाग समस्यांच्या गर्तेत आहे. विशेष म्हणजे, या विभागाचे प्रमुख असलेल्या नगर रचनाकारांना शासकीय वाहन नाही. त्यामुळे त्यांना खासगी वाहनाने दौरे करावे लागतात.

नगर रचना विभागातील रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही महिन्यात ही पदे भरली जाण्याची शक्यता आहे. नागरिकांची कामे लवकर करण्यावर आपला भर आहे.
- भाग्यश्री बोरकर,
सहाय्यक नगर रचनाकार, भंडारा.

Web Title: Work relation in the municipal office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.