जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:48+5:302021-07-12T04:22:48+5:30
सभेत ६ जुलै रोजी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या दालनात सर्व संवर्गीय कर्मचारी यांच्या मागण्या संबंधाने ...
सभेत ६ जुलै रोजी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या दालनात सर्व संवर्गीय कर्मचारी यांच्या मागण्या संबंधाने जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संबंधित अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत. सभेत १९ जुलैपासून संपूर्ण लिपिकवर्गीय कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी होणार असे एकमताने ठराव मंजूर झाला .
तथापि रविवारी झालेल्या लिपिकवर्गीय संघटनेच्या सभेत विभागीय अध्यक्ष केशरीलाल गायधने, कार्याध्यक्ष मनीष वाहने, जिल्हा सचिव यशवंत दुणेदार, सभेचे प्रभारी अध्यक्ष सुधाकर चोपकर,कोषाध्यक्ष विजय सार्वे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भागवत मदनकर, मुख्यालय अध्यक्ष नीतेश गावंडे,जिल्हा प्रतिनिधी वनिता सार्वे, शारदा लांजेवार, प्रदीपकुमार सोमवंशी, लक्ष्मीकांत घरडे, तालुका पदाधिकारी विजय ब्राह्मणकर, प्रदीप राऊत, शिवशंकर रगडे, श्रीकांत गायधने, सुरेंद्र खोकले, एस.पी. ठवरे, वीरेंद्र सतदेवे, फेफन टेंभरे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची केली निवड
सभेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुजी मते व कोविड संसर्गामुळे मृत झालेल्या लिपिक बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लिपिक संघटनेचे दिवंगत जिल्हाध्यक्ष यांच्या रिक्त जागेवर संघटनेचे पदाधिकारी सुधाकर चोपकर प्रभारी यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. प्रदीप कुमार सोमवंशी यांची जिल्हा संघटक या पदावर एकमताने निवड करण्यात आली. संचालन कार्याध्यक्ष मनीष वाहने तर आभार प्रदर्शन प्रभारी अध्यक्ष सुधाकर चोपकर यांनी केले