४७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:31 AM2019-07-24T00:31:16+5:302019-07-24T00:34:38+5:30

जल जीवन आहे. तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावरून जीवनदायीनीवैनगंगा नदी वाहते. परंतु उन्हाळ्यात तुमसरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावालागत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता ४७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर आहे.

Work on water supply scheme of Rs. 3 crore is in progress | ४७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर

४७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर

Next
ठळक मुद्देउन्हाळ्यात मिळणार घर तिथे पाणी : वैनगंगा नदीवर इंटकवेलचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जल जीवन आहे. तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावरून जीवनदायीनीवैनगंगा नदी वाहते. परंतु उन्हाळ्यात तुमसरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावालागत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता ४७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. कवलेवाडा बॅरेजवर इंटकवेलची कामे सुरु असून पुढील उन्हाळ्यात तुमसरकरांना मुबलक पाणीपुरवठा होईल अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिली.
तुमसर शहराची वाढती लोकसंख्या व जुनी जीर्ण जलवाहिण्या यातून होणारी पाणी गळती यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण होत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता मुख्यमंत्र्यांना भेटून तुमसर शहराला मुबलक पाणीपुरवठा करणारी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याकरिता विनंती केली. त्याचा आराखडा सादर करण्यात आला. वैनगंगा नदीवर कवलेवाडा बॅरेजवर इंटकवेल द्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सदर वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता ४७ कोटी मंजूर करण्यात आले. ३५ कोटींच्या निविदा पूर्ण झाल्या. सध्या केवळ तांत्रिक कामे शिल्लक आहेत.

शहरात १३७ किमीच्या जलवाहिनी
तुमसर शहरात एकुण १३७ किमीच्या अंतर्गत जलवाहिनी आहे. त्यापैकी ८५ किमीच्या जलवाहिनींची कामे झाली आहेत. उर्वरीत जलवाहिनीची कामे दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. शहरात पाच नवीन जलकुंभाची कामे सुरु आहेत. ८० टक्के कामे झाली आहेत. संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची ६० टक्के कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत कामे ३ ते ४ महिन्यात पूर्ण होणार आहे. तुमसर नगरपरिषद ब दर्जाची असून घर तिथे पाणी अशी योजना तुमसर नगरपरिषदेने तयार केली आहे. मागील अनेक वर्षापासून संपूर्ण नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्याची येथील गरज आता पूर्ण होणार आहे.

आमचा प्रयत्न आहे की, पुढील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये, प्रत्येक घरी पिण्याचे पाणी लोकांना मिळेल याकरिता मी प्रयत्नशील आहे.
-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष, तुमसर

Web Title: Work on water supply scheme of Rs. 3 crore is in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.