नगराध्यक्षांची पत्रपरिषद : शहराच्या विकास कामांवर १२ कोटी करणार खर्चतुमसर : नगरपरिषदेचा कार्यभार हाती घेताच आतापर्यंत १२ कोटी रूपये वेगवेगळ्या विकास कामावर खर्च करण्यात आले. आगामी चार महिन्यात आणखी ६ कोटी रूपये खर्च करून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, बालोद्यान, एईडी लाईट, रस्त्याचे सिमेंटकरण आदी विकास कामावर खर्चील्या जात असल्याने तुमसर शहरांचा कायापालट होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पत्रपरिषदेत दिली.कारेमोरे म्हणाले, जेव्हापासून नगराध्यक्षच्या खुर्चीवर विराजमान झालो तेव्हा पासूनच शहराला सुंदर आणि स्वच्छ कसे बनविता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले आहे. शासनाकडून आगावू निधी खेचून आणत सर्व विकास कामे करण्याचा सपाटा सुरू असताना नगर परिषदेने एक पाऊल स्वच्छतेकडे हा अभियान सुरू केला आहे. शहराला हिरवेगार आणि स्वच्छ शहर बनविण्याकरिता सर्व नगरसेवकही जोमाने भिडले असतानी ६ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. तसे टेंडर निविदाही प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रभागातील सिमेंटीकरण नाली सिमेंटी करणाकरिता २१३ लक्ष रूपये खर्चिल्या जाणार तर भंडारा रोड ते पतंजली दुर्गा कॉलोनी पर्यंतच्या रस्ताचे सिमेंटीकरणावर ३२ लक्ष रूपये शिव मंदिर रस्त्यावर १० लक्ष रूपयाचे शौचालय बांधकाम, दुर्गानगरातील जलाशयाची आवारभिंत तसेच रस्ता अनुदान योजने अंतर्गत १०५ लक्ष रूपयाचे काम, बीआरजिएफ मधून जलशुद्धीकेंद्राच्या सभोवताल संरक्षण भिंतीकरिता ३२ लक्ष रूपये तर आ. राजेंद्र जैन यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत ३९ लक्ष रूपयाचे कामे प्रस्तावित आहेत.नागरी दलितवस्ती योजने अंतर्गत गांधी सागर उद्यान रस्त्यावर एलएडी लाईट व्यवस्था तसेच नवबौद्ध योजने अंतर्गत ४५० कुटूंबांना नव्याने विज पुरवठा व शौचालये बांधून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा रोडवरील दुभाजकावर गभणे सभागृहापासून ते बाजार समितीपर्यंत एलईडी स्ट्रीट लाईट तसेच प्रत्येक वॉर्डात नवीन बालोद्यानाची निर्मितीही करणार असल्याचे कारेमोरे यांनी सांगितले.त्याच बरोबर बाजार परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला फिवर ब्लॅक बसविण्यात येणार असल्याने अतिक्रमणाचा मुद्दा संपुष्टात मदत होईल त्याचबरोबर शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावी म्हणून नवीन जलकुंभ व वितरण नलिका बसविण्यात येणार तसेच शहरातील वाढती गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याकरिता शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.शहरातील मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करून संपूर्ण शहराचा कायापालट अवघ्या ४ महिन्यात करणार असल्याची तत्परता नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी प्रतिक्रिया पत्र परिषदेत बोलून दाखविली. (शहर प्रतिनिधी)
तुमसर शहराचा कायापालट होणार
By admin | Published: July 10, 2015 1:06 AM