लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील दुर्गा नगर स्थित मुख्य रस्त्यावरील दुर्गा मंदिरात चोरट्यांनी दान पेटी फोडून नगदी रक्कम लंपास केली. मंदिराचे मुख्य केटचे कुलूप फोडून मंदिरात प्रवेश केला. हॉलमधील दोन दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या. ही घटना बुधवारी पहाटे घडली. सकाळी चोरी उघडकीस आली. मंदिर समितीचे सदस्य मुकुंद वनवे यांनी तुमसर पोलिसात तक्रार दाखल केली. चोरट्यांनी येथे मंदिरालाही सोडले नाही हे विशेष.दुर्गा नगरात सार्वजनिक दुर्गा मंदिर आहे. या मंदिरात बुधवारी चोरट्यांनी दानपेटी फोडून नगदी नोटा लंपास केल्या. लंपास नोटांची रक्कम किती याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. गुरूवारी सकाळी ७.३० च्या सुमारास पूजारीने मंदिर उघडण्यास गेल्यावर त्यांना समोरच्या गेटचे कुलूप तुटलेले आढळले.प्रवेश केल्यावर दोन दानपेट्या दिसल्या. यातील नोटा लंपास केल्याचे निर्देशनास आले तर नाणी तशीच दानपेटीत होती. मुख्य रस्त्यावर हे मंदिर असून येथून हाकेच्या अंतरावर उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे कार्यालय आहे हे विशेष. यापूर्वी या मंदिरात चोरी झाली होती.मंदिर समितीचे सदस्य मुकुंद वनवे यांनी चोरीची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात दाखल केली. तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहे. चोरट्यांचा अद्याप सुगावा लागला नाही. भुरटे चोर आहेत की टोळी आहे हा मुख्य प्रश्न आहे.
तुमसरातील दुर्गा मंदिरात धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:12 AM
शहरातील दुर्गा नगर स्थित मुख्य रस्त्यावरील दुर्गा मंदिरात चोरट्यांनी दान पेटी फोडून नगदी रक्कम लंपास केली. मंदिराचे मुख्य केटचे कुलूप फोडून मंदिरात प्रवेश केला. हॉलमधील दोन दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या. ही घटना बुधवारी पहाटे घडली.
ठळक मुद्देभर वस्तीतील घटना : यापूर्वी झाली होती मंदिरात चोरी