शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

काेराेना संकटात जिल्हा परिषद वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:35 AM

भंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार काेराेना संकटात वाऱ्यावर दिसत आहे. प्रशासकांच्या नियुक्तीपासूनच येथील यंत्रणेवरील ...

भंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार काेराेना संकटात वाऱ्यावर दिसत आहे. प्रशासकांच्या नियुक्तीपासूनच येथील यंत्रणेवरील संपूर्ण नियंत्रण गेले असून, आता काेराेना संकटात अधिकारी दिशाहीन झाले आहेत. ग्रामीण आराेग्यासह विकासाची मुख्य जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेवर सध्या कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. प्रशासक झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी तर कुणाला दिसतही नाहीत. ग्रामीण आराेग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष हाेत असल्याने काेराेनाचा संसर्ग वाढला असून, आता लसीकरणाचाही बट्ट्याबाेळ हाेत आहे. भंडारा जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्याकडे प्रशासकाचा प्रभार आहे. परंतु, त्यांचे आपल्या अधिनस्त यंत्रणेवर काेणतेही नियंत्रण नसल्याचे काेराेना संकटात प्रकर्षाने जाणवू लागले आहे. सर्वत्र काेराेनाने जनता भयभीत असताना प्रशासक काेणतीही बैठक घेताना दिसत नाहीत. आधीच काेराेना संसर्गामुळे जिल्हा परिषदेचा कारभार १५ टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण कामकाज ढेपाळले आहे.

ग्रामीण आराेग्य यंत्रणेची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. गावागावांमध्ये काेराेनाचे रुग्ण आहेत. अलीकडे लसीकरण सुरु झाले आहे. मात्र, प्रशासकांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. आराेग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी आपल्या मनमर्जीने कारभार करत आहेत. याचा फटका ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे. लसीकरणासाठी ॲपवर नाेंदणी केल्यानंतरही आणि कन्फर्मेशन झाल्यानंतरही लस मिळेलच, याची काेणतीही खात्री नाही. दुसरीकडे आराेग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे लसीबाबत ग्रामीण भागात प्रचंड गैरसमज आहे. नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. मात्र, या नागरिकांचे समुपदेशन अथवा गावागावात जावून त्यांना मार्गदर्शन करण्याची आराेग्य यंत्रणेला फुरसत मिळालेली नाही.

काेराेनाची तिसरी लाट येणार, अशी भीती वर्तवली जात आहे. परंतु, दुसऱ्याच लाटेत गारद झालेली जिल्हा परिषदेची आराेग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी गावागावात जावून भेट देत आहेत. रुग्णालयातही पाहणी करत आहेत. परंतु, जिल्हा परिषद आराेग्य यंत्रणेचे त्यांना सहकार्यच मिळत नाही. अधिकारी केवळ कागदाेपत्रीच घाेडे नाचवत असल्याचे दिसत आहे. पुढे तक्रार केली तर काेराेना संसर्गाने काम वाढल्याचा दावा करुन तक्रारीकडे पाठ फिरवली जाते. एकंदरच जिल्हा परिषदेच्या या नाकर्तेपणामुळे जनतेला मात्र नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

बाॅक्स

लाेकप्रतिनिधींची चुप्पी

जिल्हा परिषदेची घडी प्रशासक नियुक्तीपासून पूर्णत: विस्कटली आहे. जिल्हा परिषदेवर लाेकनियुक्त पदाधिकारी असताना प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला जात हाेता. अध्यक्षांपासून सभापतींपर्यंत सर्वजण त्यावर नजर ठेवून हाेते. परंतु, आता लाेकनियुक्त पदाधिकारी नसल्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रान माेकळे झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात प्रशासकांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी साकाेली येथे काही वर्ष उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. परंतु, त्यांची जिल्हा परिषदेवरील पकड काेराेना काळात सुटली आहे. दुसरीकडे आमदार, खासदार आणि विविध पक्षांचे जिल्हाप्रमुखही या प्रकारावर मूग गिळून गप्प आहेत. काेणत्याही लाेकप्रतिनिधीने पालकमंत्र्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रश्न विचारलेला नाही.

बाॅक्स

भुवनेश्वरी एस. यांचा गाजलेला कार्यकाळ

थेट आयएएस असलेल्या भुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा परिषदेला ताळ्यावर आणले हाेते. काेराेनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी जिल्हा परिषदेची आघाडी उत्तमरित्या सांभाळली. प्रत्येक अधिकाऱ्याशी बैठक, जिल्हा प्रशासनासी अधिकारी समन्वय साधून हाेते. त्यांचा जिल्हा परिषदेत दरारा हाेता. अनेकदा जिल्हा परिषदेतील विविध कक्षांना अचानक भेट देऊन त्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेत हाेत्या. मात्र, आता हे सर्व इतिहासजमा झाले आहे. जिल्हा परिषदेत काेणी कुणाला जुमानायला तयार नाही. आराेग्य यंत्रणा तर पूर्णत: हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भुवनेश्वरी एस. यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचीच जिल्हा परिषदेला गरज आहे.