दांपत्याची स्वतःच्या शेतातच आत्महत्या; सहा महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:52 PM2018-11-19T17:52:44+5:302018-11-19T17:58:37+5:30

राजू श्रीराम चोरमले ( 23 ) व अनिता राजू चोरमले ( 19 ) असे मृत दांपत्याचे नाव असून त्यांनी गावापासून तीन कि मी अंतरावरील स्वतः च्या शेतातच आत्महत्या केली. 

The couple's suicide in their own farm land; The marriage was done six months ago | दांपत्याची स्वतःच्या शेतातच आत्महत्या; सहा महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

दांपत्याची स्वतःच्या शेतातच आत्महत्या; सहा महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

googlenewsNext

केळगाव (औरंगाबाद ) : सिल्लोड तालुक्यातील आधारवाडी येथील रहिवासी पती-पत्नी यांनी रविवार (दि 18 ) दुपारी 1 वाजता गळपास घेऊन आत्महत्या केली. राजू श्रीराम चोरमले ( 23 ) व अनिता राजू चोरमले ( 19 ) असे मृत दांपत्याचे नाव असून त्यांनी गावापासून तीन कि मी अंतरावरील स्वतः च्या शेतातच आत्महत्या केली. 

मृत राजू व अनिता यांचे  6 महिण्यापूर्वी (12 मे 2018 रोजी ) लग्न झाले होते. राजूच्या पश्चात आई- वडील, भाऊ तर अनिता यांच्या पश्चात आई-वडील आहेत. त्यांच्या आत्महत्येचा कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पो नि विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक संदीप सावळे,वाघ,दांडगे करीत आहे.

Web Title: The couple's suicide in their own farm land; The marriage was done six months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.