Dil-e-Nadaan : प्रेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी 'ऊंचाली'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 03:46 PM2018-03-31T15:46:48+5:302018-03-31T15:54:06+5:30
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)
- कौस्तुभ केळकर नगरवाला
बरोब्बर पंधरा वर्षांनी साहिल भेटला.
तसाच.
फिट अॅन्ड फाईन.
सपाट पोट.
रुंद खांदे.
मोस्ट एनर्जेटिक.
रोज जिममधे, बादलीभर घाम गाळत असावा.
मला लाज वाटली.
माझीच.
डोक्यावरचे गॉन केस.
गोलमाली रुमाली रोटीसारखं वाढतं पोट.
पोळीच्या घड्या मिरवणारं.
चरबीबरोबर वाढणारा आळस.
नको ते सगळं माझ्याकडे.
हवं ते सगळं त्याच्याकडे.
माझ्या मनात जबरदस्त कॉम्प्लेक्स क्रियेट झाला.
आमची नजरानजर.
मायक्रोसेकंदात ओळख पटली.
दोन ढांगात त्यानं मला गाठलं.
पाठीवर दणकन् धपांडीईष्टॉप.
"केम छो ?
क्यों बें मोटू ?
कैसा है रे तू ?"
मी हादरलेलो.
त्सुनामी लाथाडत, मला खोल समुद्रात ढकलून देत्येय, असं वाटलं.
कसाबसा बॅलन्स सांभाळला.
साहिलची ही नेहमीची सवय.
पाठीवर दणकन् धपाटे घालायचे,
मगच बोलायला सुरुवात करायची.
देवळात शिरताना घंटा वाजवून, देवाला जागं करावं तसं.
साहिल माझा रूम पार्टनर.
चार वर्षं बरोबर काढलेली.
प्रॉपर अहमदाबादचा.
मनमौजी.
आजाद पंछी.
तितकाच मनस्वी.
प्रचंड हुशार.
लहर आली तर दहा दिवस पुस्तकाला हात नाही लावणार.
नाही तर चार चार दिवस पुस्तकांबरोबर गाडून घेणार स्वतःला.
बेफिकीर.
टेन्शन हा शब्दच नसायचा, त्याच्या डिक्शनरीत.
आमच्या कॉलेजचा टॉपर.
जगावं कसं ? हे सांगणारा अवलिया.
याउलट माझं.
साध्या साध्या गोष्टींचं टेन्शन यायचं मला.
कितीही अभ्यास झाला तरी कॉन्फी नसायचा.
साहिल खूप सांभाळून घ्यायचा.
माझा कॉन्फिडन्स वाढवला.
अभ्यासाची साधी टेक्निक्स् शेअर करायचा.
पेपरच्या आधी दोन तास मस्त रिवाईज करायचो सबजेक्ट.
गप्पा मारत अभ्यास.
लास्ट ईयरला मी सेकंड टॉपर.
आज मी जे काही आहे ते साहिलमुळे.
तो गधडा, आज इतक्या वर्षांनी.
"क्यो बें खमण ,
कहा छिप गया तू ?"
मी खमण म्हणायचो त्याला.
तो मनापासून हसला.
जवळचं एक हॉटेल गाठलं.
हॉटेल कसलं ?
अमृततुल्य.
पण साहिलला असलं अस्सल पुणेरी आवडायचं .
अगदी पहिल्यापासून.
मस्त गप्पा सुरू.
अहमदाबादला मोठ्ठी फॅक्टरी आहे त्याची.
गारमेंट फॅक्टरी.
भारतभर ऑर्डरी घेत हिंडत असतो विमानातून.
आज पुण्यात.
खरं तर कॉलेज संपल्यावर, एक दोन वर्ष टचमधे होतो.
नंतर हळूहळू कॉन्टॅक्ट कमी झाला.
माझी पहिली नोकरी मुंबईतली.
तेव्हा एकदा भेटला होता मुंबईत.
गेली दहा वर्ष मी पुण्यात.
मी पुण्यात असतो, हे साहिलला माहीतच नव्हतं.
दोन कटिंगवर, तासभर गप्पा झाल्या.
मग सेलफोनवर फॅमिली अल्बम दाखवून झाले.
बायकापोरांची चौकशी.
मला एकदम आठवलं.
"क्यो बें खमण ,
भाभीजी वही हैं क्या , जिस के लिये तू तडपता था?"
'वही है वो..'
साहिलच्या डोळ्यांनी काटकोन त्रिकोण केला.
मी फोटो नीट बघितला.
साहिलची बायको त्याच्यापेक्षा, दोन तीन इंच तरी उंच होती.
दोघंही दिलखुलास हसत होते.
अवघडलेपण बिलकुल नव्हतं.
साहिल खूप बोलायचा तिच्याविषयी.
त्याच्याच बिल्डींगमधे रहायची.
साहिलच्याच वयाची.
साहिलकी बचपन की सहेली.
दोघांचं मस्त ट्युनिंग होतं.
तिचे बाबा साहिलच्या वडिलांचे मित्र.
दोनही घरं तोलामोलाची.
फिर?
प्रॉब्लेम एकच होता.
उंचीचा.
ती पहिल्यापासून उंच.
साहिल काही कमी कमी उंच नव्हता.
पाच दहा, अकरा तरी असेल.
ती जरा जास्तच.
बहुधा सहा एक किंवा जास्तच.
"सच बोलू , मैं तो बचपन से फिदा था उस पर.
लगा था, की बडा होते होते, मेरा हाईट उसे क्रॉस कर जायेगा.
पर ऐसा नही हुवा.
बहोत कनफ्युजसा रेहता था.
कॉलेज खत्म हुवा, उस साल की बात है.
नवरात्री का सीझन था.
कॉलनी में गरबा की तैयारी चालू थी.
मै लायटींग लगा रहा था.
अचानक शॉक लगा.
मेन स्विच, पोल पे काफी हाईट पें.
वहाँ तक तो सिर्फ, उसी कें हात पहुंच सकते थे.
उसने जंप लगाकर मेन स्वीच बंद किया.
लकडी से पीटते हुवे मुझे ऐसा निचे गिराया ,
की मै सीधे उसके प्यार में गिर गया.
बस ...
मैने डिसाईड किया, यही है राईट चॉईस.
घरवालोंको बहोत समझाया.
नही माने.
फिर भागके शादी की.
हल्लूहल्लू सब सेटल हो गया.
अभी कोई प्रॉब्लेम नही है "
मी एकदम एक्सायटेड.
"साले खमण , तुजसे यही उम्मीद थी.
लेकिन बाद में ऐसा नही लगा की, जल्दबाजी में गलत डिसीजन लिया करके?"
साहिल पुन्हा बोलू लागला.
"शादी कें बाद जम हम बाहर निकलते थे , तो लोगोंकी नजरोंसे रोज मर मर के जीते थें
फिर सोचा,
की लोगोंकी सोच में इतना डेप्थ ही नही है, की वो हमारी हाईट कम्पेअर करे.
और,
तुम्हारी भाभी ने तो जादू कर दिया.
माँ बापूजी का बहोत खयाल रखती थी.
मेरा भी..
तुम्हारी भाभीका नेचर इतना केअरींग है, की मुझे माननाही पडता था की मैं उसकी उंचाई को छू नही सकूंगा.
शादी को बीस साल होने दो..
ये लंबाई , चौडाई , गोरा रंग, सब मिट जाते है.
जो कपल्स एक दुसरोंके लिये जिते है, उनकी हाईट तक कोई नही पहुँचता.."
साहिल मनापासून बोलत होता.
मला मनापासून पटलं.
"अरे , भाभी का नाम क्या है ?"
मी विचारलं.
'याद है , एक बार हम कॉलेज ट्रिप को गये थे.
कोस्टल कर्नाटका में.
एक वॉटरफॉल देखा था, नाम था ऊंचाली.
बस यही नाम रखा है .
ऊंचाली.
बस भीगते रहते है, ऊसी प्यार की बरसती धारा में '
मला हे नाव फारच आवडलं.
एकदम त्याला घड्याळ आठवलं.
"अभी निकलता हूँ यार.
नेक्स्ट टाईम तेरे घरपेंही रुकूंगा."
अॅड्रेस, सेल नंबर्स एक्सेंज केले.
आला तसा साहिल झटक्यात निघून गेला.
मी त्याच्याकडे बघतच बसलो.
एकदम मला त्याची उंची वाढल्यासारखी वाटली.
परवाची गोष्ट.
हिची सॅन्डल्सची खरेदी चाललेली.
'भैया, थोडा जादा हिलवाला दिखावो."
हिनं नेहमीसारखं सांगितलेलं.
मी सहा फूट एक इंच.
ही पाच नऊ.
माझ्यासाठी ही नेहमीच हाय हिल वापरते.
कालच व्हॉट्सअॅपवर हायहिल्सचे साईड इफेक्टस् वाचलेले.
"काही नको, फ्लॅट हिल्सच्याच घे."
हिच्या चेहऱ्यावर प्रिंटेड क्वश्चनमार्क.
'उंचीत फरक दिसला तरी काही फरक पडत नाही.
मनं सारख्या हाईटवर पाहिजेत.'
मी मनातल्या मनात, प्यार का डोस पाजला.
माझी उंची वाढवून घेतली.
जय ऊंचाली.
(रेखाचित्रः अमोल ठाकूर)