या जागतिक जलदिनी ट्रेण्ड बदलूया!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 06:12 PM2018-03-29T18:12:51+5:302018-03-29T18:12:51+5:30
वाहते पाणी ४ दशलक्ष रहिवाशांच्या मोठ-मोठ्या समस्या संपवेल, अशा ‘शून्य दिवसा’ची केप टाऊन वाट पाहात आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या म्हणण्यानुसार, आज तब्बल २.१ अब्ज लोक घरात पिण्याच्या सुरक्षित पाण्याविना राहात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच शिक्षण आणि जीवनमानावरही विपरित परिणाम होत आहे.
वाहते पाणी ४ दशलक्ष रहिवाशांच्या मोठ-मोठ्या समस्या संपवेल, अशा ‘शून्य दिवसा’ची केप टाऊन वाट पाहात आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या म्हणण्यानुसार, आज तब्बल २.१ अब्ज लोक घरात पिण्याच्या सुरक्षित पाण्याविना राहात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच शिक्षण आणि जीवनमानावरही विपरित परिणाम होत आहे. स्वच्छ पाणी न मिळणे, म्हणजे या लोकांना मूलभूत मानवी अधिकार नाकारण्यासारखे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, सन २०५०पर्यंत विकसनशील किंवा अविकसित देशांतील किमान एक चतुर्थांश लोकसंख्येला स्वच्छ पाण्याचा तुटवडा भासेल. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, आपल्यासमोरील अन्य समस्या अशुद्ध पाण्याची असून जगातील किमान १.८ अब्ज लोक पिण्याच्या पाण्यासाठीे मलमिश्रित स्रोत वापरत आहेत.
विकसनशील जगातील तीव्र दारिद्र्य आणि रोगराई संपविण्यासाठी उपसण्यात येणारे कष्ट दूषित पाणी आणि मूलभूत स्वच्छता यांच्याअभावी निष्प्रभ ठरत आहेत. भारतात पाणीटंचाई आणि निकृष्ट दर्जाचे पाणी अशा दोन्ही समस्या आहेत. आपण अक्षरश:
पाण्याच्या टाइम बॉम्बवर बसलो आहोत. सलग दोन दुष्काळी वर्षांमुळे ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. तसेच सुविधांचा
अभाव आणि अज्ञान यामुळे भारतीयांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पाण्याची उपलब्धता वाढावी आणि भारतातील मुलांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळावे, यासाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये
शासन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच आपणा सर्वांची भूमिकाही महत्त्वाची आहे, याची जाणीव करून देण्यासाठी जागतिक जल दिनासारखी औचित्ये असतात. सर्वांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कॉर्पोरेट, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था व सामान्य व्यक्तीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भूजलाचे वापरकर्ते असल्याने कॉर्पोरेट कंपन्यांनी, ते वापरत असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी परत करून पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे जलव्यवस्थापना संबंधीचे समाज विकास आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबविण्यासाठी २०१० साली ‘द हिंदुस्थान युनिलिव्हर फाउंडेशन (एचयूएफ) ना
नफा तत्त्वावरील कंपनीची स्थापना करण्यात आली. २० स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी करून एचयूएफ देशभरातील ५७ जिल्ह्यांत ‘वॉटर फॉर पब्लिक गुड’ हा उपक्रम राबवित आहे. या भागातील अनेक जागृती कार्यक्रमांनाही एचयूएफ पाठिंबा देते. जलसंचयनाचे उपक्रम, जलस्रोतांचे समाजाधारित नियंत्रण आणि शेतीसाठी पाण्याचा प्रभावी वापर आदी माध्यमातून ४५० अब्ज लीटरहून अधिक जलसंचयनाची व्यवस्था एचयूएफने तयार केली आहे.
संशोधन आणि विकास क्षेत्रातही बदल घडविणे शक्य आहे. कच्चा माल खरेदी, उत्पादन आणि वापर या प्रत्येक टप्प्यावर पाण्याचा वापर कमी करण्यासाठी एचयूएफच्या ब्रॅण्ड्सनी विशेष प्रयत्न केले आहेत. रिन हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. रिनमध्ये करण्यात आलेल्या ‘स्मार्ट फोम’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तुलनेने कमी पाण्यात कपडे धुणे शक्य होते.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड त्यांच्या विविध ब्रॅण्डमधून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही काम करते. कमी उत्पन्न गटातील
ग्राहकांसाठी ‘प्युअरइट’ने नुकतेच देशभरातील सूक्ष्म वित्त संस्थांशी भागीदारी केली आहे, अन्यथा या गटातील ग्राहकांना जलशुद्धीकरण यंत्र
घेणे परवडणारे नसते. ग्रामीण स्तरावरील उद्योजकांचे जाळे वापरून ग्रामीण भागात खोलवर पोहोचण्यासाठी ‘प्युअरइट’ने ‘धर्मा
लाइफ’सारख्या शेवटच्या टप्प्यातील वितरकाशीही भागीदारी केली आहे. कर्नाटकमधील तुमकूर येथे प्रायोगिक तत्त्वावरील ४ जलप्रकल्प
सुरू करण्यासाठी ‘प्युअरइट’ने २०१७ साली वॉटर हेल्थ इंटरनॅशनलशी भागीदारी केली. या भागातील कमी उत्पन्न गटातील ग्राहकांना या ४ प्रकल्पांतून पिण्याचे सुरक्षित पाणी पुरविले जाणार आहे. वापरातील पाणी शुद्ध किंवा उकळलेले आहे, याची शाश्वती करून घेण्यासाठी
मूळात वर्तवणुकीतील बदल आवश्यक आहेत. पाणी, स्वच्छता व आरोग्यदायी सवयी देशभरात आत्मसात केल्या जाव्यात, यासाठी एचयूएलच्या स्वच्छ आदत, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
योग्य पाणी वापरासाठी लोकांच्या वर्तवणुकीतील बदल हा महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ आणि शुद्ध पाणी वापरावे, यासह अन्य आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुजाण नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येण्याची आवश्यकता आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आणि एचयूएलच्या स्वच्छदूत उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या. www.hul.co.in/sasb