अमेय खोपकर यांचे युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:07 PM2018-05-04T22:07:43+5:302018-05-04T22:07:43+5:30
कोणत्याही वाद्याविना तयार केलेला ‘आकापेला’ प्रकारातील मराठी गाण्यांचा व्हिडीओ नुकताच या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला.
मुंबई - चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण केले आहे. कोणत्याही वाद्याविना तयार केलेला ‘आकापेला’ प्रकारातील मराठी गाण्यांचा व्हिडीओ नुकताच या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडीओला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या व्हिडीओ मध्ये दिग्गज अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह अनेक कलावंताचा समावेश आहे. या व्हिडीओला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत अमेय खोपकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
T 2793 - https://t.co/xlN2mCaLoU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 3, 2018
A first by Marathi film .. an Acapella rendition made by AVK Entertrainment, and Ameya Khopkar .. best wishes to you 🙏🌹😊
चित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या अमेय विनोद खोपकर (एव्हीके) एंटरटेन्मेंटच्या या पहिल्या युट्युब व्हिडीओची खासियत म्हणजे यामध्ये गाणे आहे मात्र स्वरवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य अशा कुठल्याही वाद्याचा यात वापर करण्यात आलेला नाही. हा संगीत प्रकार ‘आकापेला’ नावाने प्रसिध्द आहे. हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आदी दिग्गज गायक कलाकारांनी मराठी मध्ये बहुचर्चित ठरलेल्या आणि गाजलेल्या विविध गाण्यांची ‘मेडली’ केली आहे. यामध्ये black & white सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या व्हिडीओ मध्ये विक्रम गोखले, अशोक सराफ, महेश मांजरेकर, भरत जाधव, स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, फुलवा खामकर, केदार शिंदे, अभिनय देव, मकरंद अनासपुरे, विक्रम फडणीस, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, संजय जाधव, अनिकेत विश्वासराव, सोनाली खरे, विनोद कांबळी, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे, सायली संजीव, क्रांती रेडकर, दिपाली विचारे, आयान पटेल, मानसी नाईक, अभिनित पानसे, सचिन कुंभार, आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मधुरा वेलणकर,नीलिमा कुलकर्णी, साहिल जोशी, चारू देसाई,चेतन शाशिथल,अमोल परचुरे, सौमित्र पोटे, जयंती वाघधरे, प्रेरणा जंगम, विशाल इनामदार, बालकलाकार मृणाल जाधव, इशान खोपकर, तृष्णीका, स्नेहा चव्हाण, आदीसह मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत.