नोकरीचा ‘आसान’ मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 03:14 AM2017-09-10T03:14:37+5:302017-09-10T03:18:40+5:30
‘आसानजॉब्स’ने काही मूल्यनिर्धारण केंद्रे सुरू केली असून, या उपक्रमातील जाणकार नोकरी शोधणाºया उमेदवारांचे मूल्यनिर्धारण करतात. या प्रक्रियेत उमेदवारांच्या कौशल्यांचे मूल्यांकन आपोआपच
- स्नेहा मोरे
‘आसानजॉब्स’ने काही मूल्यनिर्धारण केंद्रे सुरू केली असून, या उपक्रमातील जाणकार नोकरी शोधणाºया उमेदवारांचे मूल्यनिर्धारण करतात. या प्रक्रियेत उमेदवारांच्या कौशल्यांचे मूल्यांकन आपोआपच होते व ही माहिती भविष्यकाळासाठी नोंदवून ठेवली जाते, तसेच दुसरीकडे काही नोकरी देणाºया व्यक्ती आपली माहिती ‘आसानजॉब्स’कडे नोंदवितात. कारण त्यांना नव उमेदवारांची नियुक्ती करण्याची निकड असते. त्यामुळे नोकरी देऊ करणाºया व्यक्ती या नोकरी इच्छुक उमेदवारांच्या माहितीची छाननी करतात व त्यांच्या संस्था-संघटनेच्या आवश्यकतेची पूर्तता करणारी अर्हता असणारे उमेदवार निवडतात. या बाबतीत व्यापक प्रमाणावर लोकांना मदत मिळण्यासाठी ‘आसानजॉब्स’ सर्च अॅप विकसित केले आहे.
उत्तम नोकरी मिळविणे, हा आजच्या तरुणाईसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. जवळपास प्रत्येक जॉब ओपनिंगसाठी शेकडोने अर्ज येत असतात. २०२० सालापर्यंत भारत हा २७ वर्षे वय असलेल्यांची विपुल लोकसंख्या असणारा जगातील सर्वाधिक तरुण देश बनेल. मात्र, नोकरी शोधणा-या व्यक्तींना नोकरी मिळविणे आणि नोकरी देऊ करणाºया व्यक्तींना नोकरी देणे, यासाठी संबंधित कंटाळवाण्या प्रक्रियेतून जावे लागते. यासाठी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नोकरी प्रवेश प्रक्रियेचे सुलभीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक कंपनी अर्ज केलेल्या अर्जदारांचे अर्ज पाहते व त्यानंतर संबंधित अर्जदारांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांची मुलाखत घेते. ही प्रक्रिया अतिशय वेळखाऊ आहे, तसेच दर वेळी कंपनीला हवे असतील, तसेच उमेदवार मुलाखतीस येतील असे नव्हे. ही वेळखाऊ प्रक्रिया सोपी व्हावी आणि योग्य उमेदवारापर्यंत सहज पोहोचता यावे, या उद्देशाने दिनेश गोयल, कुणाल जाधव आणि गौरव तोष्णीवाल या तीन मुंबई आयआयटियन्सनी एकत्रित येऊन ‘आसानजॉब्स’ हे अभिनव संकेतस्थळ विकसित केले. याद्वारे नोकरी प्रवेश प्रक्रियेत होणाºया वेळेचा अपव्यय टाळता येऊ शकेल.
ज्यांना नोकरी हवी आहे, असे उमेदवार आणि नोकरी देणाºया कंपनीज/रिक्रूटर्स या दोघांनाही एकाच व्यासपीठावर आणणारे हे संकेतस्थळ आहे. अगदी अकाउंटंट, डाटा एन्ट्री आॅपरेटरपासून, डिलिव्हरी बॉयपर्यंत अनेक पदांसाठी नोकरीच्या संधी या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ‘आसानजॉब्स’ने सुरू केलेल्या संकेतस्थळावर नोंदणीची अगदी सोपी पद्धत देण्यात आली आहे. त्यामुळे फार कमी शिकलेले लोकसुद्धा सहजतेने त्यामधून नोकरीच्या संधी शोधू शकतात. कंपन्यांनाही त्यांच्या गरजेप्रमाणे उमेदवार निवडता येत असल्याने, नोकरी मिळविण्याची ही पद्धत अगदी सोपी बनली आहे. उमेदवारासाठी रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, जॉब अप्लाय आणि इंटरव्ह्यू अशा चार टप्प्यांतील सोपी प्रक्रिया आहे. उमेदवाराचे राहण्याचे ठिकाण आणि नोकरीचे ठिकाण, यानुसार ‘आसानजॉब्स’ने फिल्टर विकसित केले असून, कंपन्या त्याचा वापर करून, योग्य उमेदवाराशी संपर्क साधू शकतात.
जवळपास ९० टक्के नोकरीच्या संधी या एन्ट्री लेव्हल अर्थात, ‘ब्लू कॉलर जॉब’ या प्रकारातील असतात. देशातील सर्वात मोठ्या नोकरदार वर्गाला एकत्र आणण्यासाठी हे वेबपोर्टल सुरू केल्याचे ‘आसानजॉब्स’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश गोयल सांगतात. हे संकेतस्थळ आजमितीस टोयोटा, युरेका फोर्ब्स, आयसीआयसीआय बँक, होलाशेफ, आयटीएम, बॉक्स एट, कारवेलडॉटकॉम, बेवकूफडॉटकॉम यासारख्या ५०० कंपन्यांशी संलग्न आहे. ‘आसानजॉब्स’चे व्यवसाय विकास प्रमुख सिद्धार्थ दास सांगतात की, ‘या संकेतस्थळाच्या साहाय्याने नोकरी देणाºया कंपनी व उमेदवार यांना मदतच झाली आहे. उमेदवाराचा प्रोफाइल नीटपणे पडताळतो, त्यामुळे नोकरी देताना विलंब होत नाही, तसेच उमेदवारालाही नोकरीच्या स्वरूपाची सुस्पष्ट कल्पना येते.’
हे अॅप नव्या नोकरीच्या संधी शोधणाºयांसाठी सहज उपलब्ध होऊ शकते. त्यात प्रतिसाद, मुलाखती, निवड प्रक्रियाविषयक प्रगती, तसेच सेल्फी व्हिडीओजदेखील समाविष्ट करता येतात. यामुळे नोकरी देणाºया व्यक्ती व नोकरी शोधणाºया व्यक्ती यांच्यात देवाण-घेवाण सहज शक्य झाली आहे.