किल्ले शिवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:46 AM2017-11-26T02:46:48+5:302017-11-26T02:47:05+5:30
मुंबई शहरात चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला म्हणून शिवडी किल्ला ओळखला जातो. शिवाय फ्लेमिंगो बघायचे असतील तर इथेच यावे लागते. अशा या किल्ल्याचा इतिहास नोंद घेण्यासारखा आहे.
- गौरव भांदिर्गे
मुंबई शहरात चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला म्हणून शिवडी किल्ला ओळखला जातो. शिवाय फ्लेमिंगो बघायचे असतील तर इथेच यावे लागते. अशा या किल्ल्याचा इतिहास नोंद घेण्यासारखा आहे.
इतिहास
दकुना नामक इतिहासकाराच्या मते, शिवजवळील छोटी जागा अशा अर्थी त्याला शेवरी व नंतर अपभ्रंश होऊन शिवडी असे नाव पडले. शिवबेटापर्यंतचा प्रदेश पोर्तुगिजांकडून पदरात पडूनही प्रारंभीच्या काळात आर्थिक अडचणीमुळे ब्रिटिशांनी शिवडीकडे फारसे लक्ष दिले नाही. सिक्रेट अॅण्ड पॉलिटिकल डिपार्टमेंटच्या डायरी क्रमांक १,४१,७७३ मधील नोंदीत शिवडीकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली देण्यात आली आहे.
शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. ब्रिटिश स्थिरावल्यानंतर इ.स. १६८० साली शिवडीचा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याचे स्वरूपही चौकी स्थापत्यासारखे असावे. इ.स. १६८९ साली औरंगजेबाचा सरदार याकूतखान सिद्धी याने मुंबईवर स्वारी केली. त्याने प्रथम शिवडी किल्ला जिंकून घेतला. त्या वेळी किल्ल्यावर ५० शिपाई, १ सुभेदार व १० तोफा होत्या. त्यानंतर त्यांनी तेथून माझगावपर्यंत मुसंडी मारल्याची नोंद सापडते. पण तहामुळे याकूतखानला तसेच परतावे लागले.
इ.स. १८१८ मध्ये पेशवाई बुडाली व इंग्रजांची मुंबईवर सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे चौकी स्थापत्याच्या किल्ल्यांची उपयुक्तता संपुष्टात आली. म्हणून या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. ब्रिटिशांनी १७८९ मध्ये मलबारच्या काही मोपल्यांना कैदेत ठेवले होते. पण या मोपल्यांना तुरुंगातून पळून जाण्यास यश मिळाले. म्हणून यानंतर या किल्ल्याचा वापर मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोदाम म्हणून करण्यास सुरुवात झाली.
या किल्ल्याच्या पाठीशी असलेले बंदर नंतर टँक बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले. किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजे ‘शिवडीची दलदल’. हे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते ठिकाण असून दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान फ्लेमिंगो हजारोंच्या संख्येने येथे येतात. या फ्लेमिंगोंचे दर्शन घेण्यासाठी पक्षीतज्ज्ञ आणि पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात येथे पाहायला मिळते. कुना नामक इतिहासकाराच्या मते, शिवजवळील छोटी जागा अशा अर्थी त्याला शेवरी व नंतर अपभ्रंश होऊन शिवडी असे नाव पडले. शिवबेटापर्यंतचा प्रदेश पोर्तुगिजांकडून पदरात पडूनही प्रारंभीच्या काळात आर्थिक अडचणीमुळे ब्रिटिशांनी शिवडीकडे फारसे लक्ष दिले नाही. सिक्रेट अॅण्ड पॉलिटिकल डिपार्टमेंटच्या डायरी क्रमांक १,४१,७७३ मधील नोंदीत शिवडीकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली देण्यात आली आहे.
शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. ब्रिटिश स्थिरावल्यानंतर इ.स. १६८० साली शिवडीचा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याचे स्वरूपही चौकी स्थापत्यासारखे असावे. इ.स. १६८९ साली औरंगजेबाचा सरदार याकूतखान सिद्धी याने मुंबईवर स्वारी केली. त्याने प्रथम शिवडी किल्ला जिंकून घेतला. त्या वेळी किल्ल्यावर ५० शिपाई, १ सुभेदार व १० तोफा होत्या. त्यानंतर त्यांनी तेथून माझगावपर्यंत मुसंडी मारल्याची नोंद सापडते. पण तहामुळे याकूतखानला तसेच परतावे लागले.
इ.स. १८१८ मध्ये पेशवाई बुडाली व इंग्रजांची मुंबईवर सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे चौकी स्थापत्याच्या किल्ल्यांची उपयुक्तता संपुष्टात आली. म्हणून या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. ब्रिटिशांनी १७८९ मध्ये मलबारच्या काही मोपल्यांना कैदेत ठेवले होते. पण या मोपल्यांना तुरुंगातून पळून जाण्यास यश मिळाले. म्हणून यानंतर या किल्ल्याचा वापर मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोदाम म्हणून करण्यास सुरुवात झाली.
या किल्ल्याच्या पाठीशी असलेले बंदर नंतर टँक बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले. किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजे ‘शिवडीची दलदल’. हे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते ठिकाण असून दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान फ्लेमिंगो हजारोंच्या संख्येने येथे येतात. या फ्लेमिंगोंचे दर्शन घेण्यासाठी पक्षीतज्ज्ञ आणि पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात येथे पाहायला मिळते.
पाहण्याची ठिकाणे
मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या या किल्ल्याचे नूतनीकरण पुरातत्त्व खात्याने केले आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी पायºया आहेत. या मार्गाने आपण सय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो.
किल्ल्याच्या काटकोनात वळणाºया प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडावून म्हणून केला गेला.
किल्ल्याच्या चारी बाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. तर त्रिकोणाकृती बुरूज येथे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या तटात बांधलेल्या प्रशस्त जिन्याने तटावर जाता येते.
किल्ल्यावर पोहोचण्याच्या वाटा :
हार्बर रेल्वेमार्गावरील शिवडी स्थानकाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. शिवडी स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरून बाहेर पडून कोलगेट पामोलिव्ह या कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता पकडावा. या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण शिवडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.