विचार आणि वर्तनाची सांगड महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:16 AM2018-02-11T01:16:56+5:302018-02-11T01:17:08+5:30
१७ वर्षांचा तरुण. महाविद्यालयात नुकतात जायला लागला आहे. मात्र, वयाच्या अशा टप्प्यावर असल्याने प्रत्येक स्त्रीकडे पाहून वाईट विचार मनात येत होते. हे विचार लैंगिक प्रकारचे होते. हे विचार थांबविण्यासाठी या तरुणाने प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही.
-डॉ. मिन्नू भोसले
१७ वर्षांचा तरुण. महाविद्यालयात नुकतात जायला लागला आहे. मात्र, वयाच्या अशा टप्प्यावर असल्याने प्रत्येक स्त्रीकडे पाहून वाईट विचार मनात येत होते. हे विचार लैंगिक प्रकारचे होते. हे विचार थांबविण्यासाठी या तरुणाने प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. अशा वेळी डॉक्टरांच्या मदतीने या विचार आणि वर्तनाच्या द्वंद्वातून तरुणाची सुटका झाली. वयाच्या अशा आडवळणावर बºयाच तरुण-तरुणींना या टप्प्यातून जावे लागते. त्यासाठी विचार आणि वर्तनाची सांगड घालणे महत्त्वाचे असते. मात्र, यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे, याविषयी थोडसे...
लैंगिक विचारांना कसा आळा घालावा ?
वयाच्या या टप्प्यावर मनात लैंगिक विचार येणे ही अत्यंत नैसर्गिक आणि निसर्गानुरूप घडणारी गोष्ट आहे. त्यात वाईट म्हणता येईल, असे काही नाही. लैंगिक विचार येणे आणि लैंगिक भावना जागृत होणे. स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, या टप्प्यावर लैंगिक शिक्षणाची अधिक गरज असते. कारण लैंगिक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केल्यास, त्यातूनच विकृती निर्माण होते.
लैंगिक वर्तनाविषयी म्हणजे नेमके काय?
वयाच्या या टप्प्यावर लैंगिक वर्तन करणे चुकीचे आहे. मात्र, लैंगिक उत्तेजना निर्माण झाल्यास एकांतात हस्तमैथुन करणे हा सोपा मार्ग आहे. हस्तमैथुन करण्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र, या प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेची काळजी घेणे खूप आवश्यक असते.
लैंगित शिक्षणाविषयी जाणून घेऊ ?
वयाच्या या टप्प्यावर होणाºया त्रासावर उपाय म्हणून लैंगिक ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी लैंगिक शिक्षण शिबिरात सहभागी होणे, त्यातून या विषयाबद्दल जाणून घेतल्यास त्रास कमी होतो. कारण अशा संवेदनशील वयाच्या टप्प्यावर लैंगिकतेविषयी अधिक कुतूहल दिसून येते. त्यामुळे हे वेळीच जाणून त्याबद्दल या मुला-मुलींना जागरूक करणे गरजेचे आहे.