भारतीय वनसेवा परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 02:02 AM2017-12-24T02:02:32+5:302017-12-24T02:03:14+5:30

भारतातील वनांचे संरक्षण, वनांचे संवर्धन आणि वनांचे पुनर्जीविकरण करण्यासाठी भारतीय वनसेवेची स्थापना करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर जंगले व वन्यप्राणी आहेत.

 Indian Service Service | भारतीय वनसेवा परीक्षा

भारतीय वनसेवा परीक्षा

- प्रा. राजेंद्र चिंचोले

भारतातील वनांचे संरक्षण, वनांचे संवर्धन आणि वनांचे पुनर्जीविकरण करण्यासाठी भारतीय वनसेवेची स्थापना करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर जंगले व वन्यप्राणी आहेत. राष्टÑीय वन धोरणाची अंमजबजावणी करण्याचे काम भारतीय वनसेवा अधिकाºयांवर आहे. त्यामुळे हे पद अतिशय महत्त्वाचे आहे.

भारतीय वनसेवा ही भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा यांच्याबरोबर असलेली तिसरी अखिल भारतीय सेवा आहे. भारतातील वनांचे संरक्षण, वनांचे संवर्धन आणि वनांचे पुनर्जीविकरण करण्यासाठी भारतीय वनसेवेची स्थापना करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर जंगले व वन्यप्राणी आहेत.
भारतीय वनसेवेसाठीची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे केली जाते. देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत पशुपालन, पशुचिकित्सा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शेतकी, वाणिकी, अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, सांख्यिकी या विषयात पदवी असणारे आणि वय २१ ते ३२ वर्षे असलेल्या उमेदवारास ही परीक्षा देता येते. इतर मागास वर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे व एससी, एसटी उमेदवारांसाठी ३७ वर्षे आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारतीय वनसेवेची पूर्वपरीक्षा ही नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेसोबत घेतली जाते. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा असल्याचे भारतीय वनसेवा परीक्षेबद्दल म्हटले जाते. २०१३ या वर्षापासून भारतीय वनसेवा परीक्षेची पद्धत बदलण्यात आली आहे. ही परीक्षा १) पूर्व परीक्षा २) मुख्य परीक्षा ३) मुलाखत या तीन टप्प्यांत घेण्यात येते. भारतीय वनसेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा नागरी सेवेच्या (Civil Service)  पूर्वपरीक्षेतच घेण्यात येते. मात्र, मुख्य परीक्षा वेगळी असते. पूर्वपरीक्षेचे गुण निवड प्रक्रि येत विचारात घेतले जात नाहीत. पूर्वपरीक्षा ही फक्त चाळणी परीक्षा आहे. मुख्य परीक्षेत मिळालेले गुण व मुलाखतीत मिळालेले गुण यांची एकत्रित बेरीज करून, अंतिम गुणवत्ता यादीत आधारे उमेदवारांची निवड केली जाते.
वनसेवा मुख्य परीक्षेसाठी योग्य उमेदवार निवडणे हा पूर्वपरीक्षेचा उद्देश असतो. पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. त्यात प्रत्येकी २०० गुणांचे सामान्य अध्ययन व कलचाचणी (सी सॅट) हे दोन पेपर असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी हा दोन तासांचा असतो. कलचाचणी (सी सॅट) या पेपरचे गुण मुख्य परीक्षेच्या निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. मात्र, कलचाचणी (सी सॅट) या पेपरमध्ये २०० पैकी ६६ म्हणजेच, ३३ टक्के गुण मिळविणे आवश्यक असते.
सामान्य अध्ययन या २०० गुणांच्या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश दिला जातो. या परीक्षेत ऋण गुणांकन पद्धत असून, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३३३ गुण वजा केले जातात. सामान्य अध्ययन या पेपरमध्ये एकूण १०० प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारले जातात. भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय सामाजिक विकास, पर्यावरण, जैवविविधता, हवामान बदल, विज्ञान, तंत्रज्ञान, चालू घडामोडी या घटकांचा यात समावेश असतो.
कलचाचणी (सी सॅट) या पेपरमध्ये एकूण ८० प्रश्न प्रत्येक २.५ गुणांसाठी असतात. यात आकलन क्षमता, तर्कपद्धती, पृथ:क्करण क्षमता, निर्णय क्षमता, बौद्धिक क्षमता, गणितीय क्षमता, इंग्रजी भाषा क्षमता, समस्या निराकरण क्षमता व्यवस्थापकीय अभिवृत्ती क्षमता परीक्षण यांचा समावेश असतो.
पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी एनसीईआरटीच्या इ. ५वी ते १२वी पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास, योजना, कुरुक्षेत्र ही मासिके, द हिंदू या वर्तमानपत्रांचा अभ्यास आवश्यक आहे, तसेच १) इंडिया इअर बुक २) माजिद हुसेन यांचे जॉग्रफी ३) तामिळनाडू राज्य मंडळाचे आर्ट अँड कल्चर ४) इकॉनॉमिक सर्वे ५) रमेश सिंग यांचे इंडियन इकॉनॉमिक्स ६) लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी ७) बिपीन चंद्रा यांचे मॉडर्न हिस्ट्री ८) स्पेक्ट्रमचे ब्रिफ हिस्टरी आॅफ मॉडर्न इंडिया या पुस्तकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, तसेच www.Insightiasonindia.com, www.iasbaba.com, www .byjuclasses/ias.com  या वेबसाइट उपयुक्त आहे. सी सॅटच्या अभ्यासासाठी ळटऌ, अग्रवाल, अरिहंत, तसेच टायरा व कुंदन यांचे सीसॅट ही पुस्तके उपयुक्त आहेत.

1भारतीय वनसेवा परीक्षेचे पूर्व, मुख्य व मुलाखत हे ३ टप्पे वेगळे असले, तरी त्याचा अभ्यास समग्र दृष्टीकोनातून केला पाहिजे. उमेदवारांनी आपली आवड, क्षमता, मर्यादा, कच्चे दुवे यांचा अभ्यास केला पाहिजे. पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी विशेष तंत्र व संकल्पनात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे.
2वैकल्पिक विषय निवडताना संबंधित विषयातील रस, त्या विषयाच्या मार्गदर्शनाची व संदर्भ साहित्याची उपलब्धता या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. कृषी, कृषी अभियांत्रिकी पशुपालन, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, गणित, भौतिकशास्त्र, वानिकी, प्राणिशास्त्र, यांत्रिक अभियांत्रिकी, सांख्यिकी यापैकी दोन विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडू शकतात.
3मुख्य परीक्षेत वर्णनात्मक, विश्लेषणात्मक, तुलनात्मक, मूल्यमापनात्मक प्रश्न विचारले जातात. प्रभावी लेखन कौशल्य, योग्य परिभाषा, समर्पक उदाहरणे, समकालीन माहिती यांचा संदर्भ आवश्यक असतो. मुलाखतीसाठी ३०० गुण असतात. लेखी परीक्षेचे १,४०० गुण व मुलाखतीचे ३०० गुण अशा एकूण १,७०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते. मुलाखतीमध्ये शैक्षणिक माहिती, चालू घडामोडी, वनविषयक घडामोडींबद्दल ज्ञान, वननिती, भौगोलिक ज्ञान, वनांचे आवरण, वन्यजीव आणि सांस्कृतिक घडामोडींविषयी प्रश्न विचारले जातात.

मुलाखतीसोबत शारीरिक
चाचणी घेतली जाते. महिलांना ४ तासांत १४ किमी. धावणे/चालणे पूर्ण करावे लागते.
पुरुषांसाठी ४ तासांत २५ किमी. धावणे/चालणे पूर्ण करावे लागते.
भारतीय वनसेवेसाठी निवड झालेल्यांना मसुरी व डेहराडून येथे प्रशिक्षण दिले जाते. सुरुवात वन सहायक संरक्षक म्हणून होते. यानंतर, वनसंरक्षक, नंतर मुख्य वनसंरक्षक, वन महासंचालक अशी बढती मिळत जाते.

मुख्य परीक्षा
भारतीय वनसेवेत उपलब्ध जागांच्या साधारणत: १२ ते १५ पट उमेदवारांना भारतीय वनसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाते. मुख्य परीक्षा ही १,४०० गुणांची असून, मुख्य परीक्षेला ६ पेपर असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी ३ तासांचा असतो.
पेपर क्र. १ इंग्रजी ३०० गुण ३ तास
पेपर क्र. २ सामान्य ज्ञान ३०० गुण ३ तास
पेपर क्र. 3 वैकल्पिक विषय-१ पेपर-१ २०० गुण ३ तास
पेपर क्र. ४ वैकल्पिक विषय-१ पेपर-२ २०० गुण ३ तास
पेपर क्र. ५ वैकल्पिक विषय-२ पेपर-१ ३०० गुण ३ तास
पेपर क्र. ५ वैकल्पिक विषय-२ पेपर-२ ३०० गुण ३ तास

Web Title:  Indian Service Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.