मुलांशी साधा सोपा संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 02:25 AM2018-01-21T02:25:53+5:302018-01-21T02:26:12+5:30

अकरा वर्षांची मुलगी. शाळेतल्या मधल्या सुटीत ज्या वेळेस सगळी मुलं खेळण्यात दंग व्हायचे, त्या वेळेस ही मात्र एकटीच खेळत बसायची. तिला कधीच कुणाची सोबत लागायची नाही. मात्र तिचा हाच एकटेपणा शाळेतल्या शिपायाने हेरला आणि सलग दोन महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

 Simple communication with children! | मुलांशी साधा सोपा संवाद!

मुलांशी साधा सोपा संवाद!

- डॉ. राजन भोसले

अकरा वर्षांची मुलगी. शाळेतल्या मधल्या सुटीत ज्या वेळेस सगळी मुलं खेळण्यात दंग व्हायचे, त्या वेळेस ही मात्र एकटीच खेळत बसायची. तिला कधीच कुणाची सोबत लागायची नाही. मात्र तिचा हाच एकटेपणा शाळेतल्या शिपायाने हेरला आणि सलग दोन महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आपल्यासोबत काय होतंय, याची किंचितही कल्पना नसलेली चिमुरडी अचानक शाळा म्हटल्यावर घाबरायला लागली. तिचं बदलणं पालकांच्या लक्षात आलं आणि मग हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर बराच काळ तिच्यावर उपचार सुरू होते. समुपदेशनादरम्यान या चिमुरडीशी संवाद साधून डॉक्टरांच्या चमूलाही बºयाच गोष्टींचं आकलन झालं.

लैंगिक शिक्षणाची सुरुवात कशी करावी?
लैंगिक शिक्षण हा शब्द कानी पडला की, आता हे कसे शिकवायचे हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे थेट लैंगिक शिक्षण शिकवायला हवे, असे न म्हणता पहिल्यांदा याविषयी पालक, शिक्षकवर्ग, ट्युशनचे शिक्षक अशा लहानग्यांशी निगडित घटकांना सजग केले पाहिजे. त्यानंतर या घटकांना लैंगिक शिक्षणाचे महत्त्व उमगल्यानंतर ते लहानग्यांपर्यंत पोहोचविणे सोपे होईल. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी पाऊल उचलले तर ती बाब स्वागतार्ह आहेच, मात्र केवळ त्यावर अवलंबून न राहता जबाबदार नागरिक म्हणून आपल्याच लहानग्या पिढीसाठी विविध घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्राथमिक पातळीवर लैंगिक शिक्षणाची गरज समजली की, त्यानंतर अंमलबजावणी करणे सोपे जाते.

लहानग्यांशी संवाद कसा साधावा ?
स्पर्शज्ञान, अवयवांची ओळख करून देणे या टप्प्यापासून लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करावी. त्यात अवयवांची ओळख करून देताना शास्त्रीय संज्ञांचा वापर करून लहानग्यांना त्याविषयी सविस्तर सांगावे. वयात येण्याच्या टप्प्यावर अत्यंत नाजूक स्थिती असताना आपल्यात होणारे बदल बºयाचदा लहानग्यांना लक्षात येत नाहीत. त्यामुळे हे बदल नेमके कोणते, कशा पद्धतीने होतात, का होतात, मिसरूड का फुटते, पाळी का येते या प्रश्नांची वेळीच लहानग्यांना समजेल अशा भाषेत उत्तरे द्यावीत. सध्या विविध उत्तम भाषेतील माध्यमे हा विषय पोहोचविण्यासाठी उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या मदतीनेही हे विषय लहानग्यांना सांगता येतात.

शाळांमध्ये कशी सुरुवात करावी?
शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या विषयात या लैंगिक शिक्षणाचा समावेश करता येईल. मात्र त्या-त्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी त्याचे टप्पे आखून देण्यात यावे. इयत्ता-वयाप्रमाणे हे विषय समजावून सांगण्यात यावे. हा विषय समजून घेताना शिक्षकांना विविध नव्या माध्यमांचा वापर करण्यास सांगावे. जेणेकरून, चित्रे, पोस्टर्स, प्रेझेंटेशन, गप्पा यातून विद्यार्थ्यांना हा विषय समजण्यास सुुरुवात होईल.
 

Web Title:  Simple communication with children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई