सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धान्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:33 AM2018-02-25T01:33:13+5:302018-02-25T01:33:13+5:30
ब्राहेने केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या कक्षेबाबत ३ नियम मांडले. पहिला नियम होता, ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिक्रमा करतात. म्हणजे ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर कमी-जास्त होत असते.
- अरविंद परांजपे
ब्राहेने केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या कक्षेबाबत ३ नियम मांडले. पहिला नियम होता, ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिक्रमा करतात. म्हणजे ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर कमी-जास्त होत असते. उरलेले २ नियम गणिती आहेत, पण त्यांचा सारांश असा की, जेव्हा ग्रह सूर्याच्या जवळून जातो तेव्हा त्याची गती वाढते आणि दूर जाताना ही गती कमी होत जाते. तर तिसरा नियम ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर आणि त्याच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कालावधीला जोडणारा होता. केप्लरचे नियम गणिती होते. त्यांना न्युटनने गुरुत्वीय बलाच्या स्थिरांकाचा आधार दिला.