न्यायालयात वावरताना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:24 AM2018-02-25T00:24:20+5:302018-02-25T00:24:20+5:30
‘लढणे हे कर्तव्य आहे,’ असे गीता सांगते. ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ असे म्हणणारे तुकोबा पुढे म्हणतात, ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’. तर समर्थांनी, ‘पत्रेवीण पर्वत करू नये’ (लेखी पुराव्याशिवाय व्यवहार करू नये) आणि ‘गोहीविण जाऊ नये राजद्वारा’ (साक्षीशिवाय न्याय मागायला जाऊ नये), असा इशारा दिला आहे. वेदांमध्येही न्याय शास्त्र आहे.
- अॅड. नितीन देशपांडे
‘लढणे हे कर्तव्य आहे,’ असे गीता सांगते. ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ असे म्हणणारे तुकोबा पुढे म्हणतात, ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’. तर समर्थांनी, ‘पत्रेवीण पर्वत करू नये’ (लेखी पुराव्याशिवाय व्यवहार करू नये) आणि ‘गोहीविण जाऊ नये राजद्वारा’
(साक्षीशिवाय न्याय मागायला जाऊ नये), असा इशारा दिला आहे. वेदांमध्येही न्याय शास्त्र आहे.
‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे म्हणणारा मूर्ख कोण, हे मी शोधतोय. सामाजिक शांततेकरिता आवश्यक असलेल्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावू नये, म्हणजे काय? अन्यायाविरुद्ध गप्प बसणे ही आपली संस्कृती नाही. किंबहुना, ‘लढणे हे कर्तव्य आहे,’ असे गीता सांगते. ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ असे म्हणणारे तुकोबा पुढे म्हणतात, ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’. तर समर्थांनी, ‘पत्रेवीण पर्वत करू नये’ (लेखी पुराव्याशिवाय व्यवहार करू नये) आणि ‘गोहीविण जाऊ नये राजद्वारा’ (साक्षीशिवाय न्याय मागायला जाऊ नये), असा इशारा दिला आहे. वेदांमध्येही न्याय शास्त्र आहे.
पूर्वी न्यायदान राजे मंडळीच करत असावीत. न्यायालये औपचारिकपणे कधीपासून काम करू लागली, मला माहीत नाही, पण राघोबाला देहान्त प्रायश्चित्त देणारे, न्यायालयच ना? ‘राजा कधीच चुकत नाही’ या ब्रिटिश न्यायतत्त्वाला छेद देणारा निकाल १८६८ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या कोलकात्याच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘पेनिन सुलर एंड अँड ओरिएंटल स्टीम नेव्हिगेशन’ कंपनीच्या निकालात दिला. कंपनीच्या नोकरांना नागरिकाच्या घोडागाडीच्या घोड्यांना इजा करण्याबद्दल न्यायालयाने नुकसानभरपाई द्यायला लावली.
न्यायालयाचे दरवाजे ठोठावली नाही, तर लोकशाहीच्या दोषांचा फायदा उठवत सत्तेला चिकटणाºयाला खाली कोण खेचणार? क्रूर गुन्ह्यांना शिक्षा कशी होणार? न्यायालयीन परीक्षण हा आपल्या राज्य घटनेचा मूळ गाभा आहे आणि कुठलेच सरकार घटनादुरुस्ती करून त्यात बदल करू शकत नाही. इतके न्यायालयाचे महत्त्व आहे.
‘मी आरोपी कसा झालो’ यात आचार्य अत्रे यांनी कोर्टाचे वर्णन ‘कंटाळवाणे वातावरण’ असे केले आहे. नुकतेच मी डॉ. केनेथ हॅम्ब्ले यांचे ‘हाऊ टू इम्प्रूव्ह युवर कॉन्फिडन्स’ हे पुस्तक वाचले. त्यात न्यायालयात आत्मविश्वासपूर्वक कसे वावरावे, असा भाग आहे. लेखक म्हणतो की, न्यायालयाचे वातावरण एकंदरीत धाकदायकच ठेवलेले असते, पण आपला वकील आणि न्यायाधीशसुद्धा तुमचा ताण बराच कमी करतात. तरीसुद्धा न्यायालयात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी प्रामाणिकपणा हे एकमेव अस्त्र आहे, असे हॅम्ब्ले म्हणतात.
(लेखक हायकोर्टात वकील आहेत.)