कष्टाशिवाय यशाचा मार्ग नाही - मीनल नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:35 AM2018-03-09T06:35:40+5:302018-03-09T06:35:40+5:30
निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. तसेच सातत्यपूर्ण कष्टाशिवाय जीवनात यशाचा मार्ग सापडत नाही. त्याचप्रमाणे भारताला जगातील सर्वांत विकसित देश म्हणून पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत जेट एअरवेजच्या मीनल नाईक यांनी सोमवारी व्यक्त केले.
पुणे - निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. तसेच सातत्यपूर्ण कष्टाशिवाय जीवनात यशाचा मार्ग सापडत नाही. त्याचप्रमाणे भारताला जगातील सर्वांत विकसित देश म्हणून पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत जेट एअरवेजच्या मीनल नाईक यांनी सोमवारी व्यक्त केले.
दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (डिक्की) निमित्त आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘महिला उद्योजक सक्षमीकरण’ कार्यक्रमात मीनल नाईक बोलत होत्या. ‘डिक्की’चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, ‘ओ’ हॉटेलच्या व्यवस्थापकीय संचालक नीलम शेवलेकर, महाराष्ट्र डिक्कीच्या महिला विभागप्रमुख स्नेहल लोंढे, निश्चय शेळके, आरती कांबळे, अविनाश जगताप आदी कार्यक्रमास उपस्थित होते. याप्रसंगी नाईक व शेवलेकर यांच्या हस्ते कमल परदेशी, स्मिता रणपिसे, प्राजक्ता गायकवाड, शिल्पा गणवीर, ज्योत्स्ना खंडागळे, स्वाती सुकुंडे आदी महिला उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला.
नाईक म्हणाल्या, महिला विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. नोकरी करणाºया महिला आता उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवत आहेत.मी स्वत: हिºयांचा व्यवसाय करते. त्याचप्रमाणे ‘डिक्की’च्या माध्यमातून अनेक महिला कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. त्यांच्याकडून पुढील काळात मलाही खूप काही शिकायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नीलम शेवलेकर व कमल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल लोंढे यांनी प्रास्ताविक, तर आरती कांबळे यांनी आभार मानले.
दरम्यान, दुस-या सत्रात जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांना कोणत्या सुविधा मिळू शकतात. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय कसा करावा, त्यातून त्यांना रोजगार कसा उभा करता येतो, त्याचप्रमाणे बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी कोणती कागदपत्र सादर करावे लागतात, याबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
समाज व्यवस्थेच्या तळातील उद्योजकांना डिक्कीने एकत्र केले आहे. त्यात देशभरातील सुमारे ५०० महिलांचा सहभाग आहे. दलित समाज सर्व क्षेत्रांत नेतृत्व करत आहे. डिक्कीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात नेतृत्व उभे केले जात आहे. महिला पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. परंतु, आजही त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
- मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, डिक्की