शाहरूखला करायची नव्हती ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये राजची भूमिका, कारण वाचून व्हाल अवाक्...
By अमित इंगोले | Published: October 20, 2020 02:32 PM2020-10-20T14:32:00+5:302020-10-20T14:37:44+5:30
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमात राजची आयकॉनिक भूमिका साकारणाऱ्या शाहरूख खानने सोशल मीडियावर त्याचं नावही बदललं आहे. त्याने ट्विटरवर राज मल्होत्रा असं नाव केलं. लोक या सिनेमाच्या वेगवेगळ्या पडद्यामागच्या गोष्टी शेअर करत आहेत.
बॉलिवूडच्या सर्वात खास आणि गाजलेल्या सिनेमांपैकी एक असलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमाने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. सोशल मीडियावर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चा हॅशटॅग सकाळपासून ट्रेंड करत आहे. या सिनेमात राजची आयकॉनिक भूमिका साकारणाऱ्या शाहरूख खानने सोशल मीडियावर त्याचं नावही बदललं आहे. त्याने ट्विटरवर राज मल्होत्रा असं नाव केलं. लोक या सिनेमाच्या वेगवेगळ्या पडद्यामागच्या गोष्टी शेअर करत आहेत.
९०च्या दशकात आलेला हा सिनेमा या काळातील सर्वात मोठा सिनेमा मानला जातो. शाहरूख खानला कास्ट करणं त्यावेळी निर्मात्यांसाठी मोठ्या मुश्कीलीचं काम होतं. हा सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा सिनेमा ठरला. पण रोमान्स किंग म्हणून लोकप्रिय असलेल्या शाहरूख खानला 'राज'ची रोमॅंटिक भूमिका साकारायची नव्हती.
फिल्म जर्नलिस्ट अनुपमा चोप्राने आपल्या पुस्तकात लिहिले की, कशाप्रकारे शाहरूख खान या सिनेमाचा भाग झाला. तिने लिहिले की, 'शाहरूख खानला इतर खान आमिर आणि सलमानप्रमाणे लव्हर बॉयचा रोल करायचा नव्हता. त्याला बॉलिवूड पठडीबाज मार्गाने चालायचं नव्हतं. त्याला त्याच्या प्रेक्षकांनी वेगळा अभिनेता पहावं अशी त्याची इच्छा होती. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं'. (काजोल टॉवेल डान्स करणार नव्हती तर शाहरूखने घातलं होतं दुसऱ्याचं जॅकेट, DDLJ च्या माहीत नसलेल्या गोष्टी!)
आदित्य चोप्रा, शाहरूख खानला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमात कास्ट करण्यासाठी तीन आठवडे मागे लागला होता. एक अशीही वेळ आली होती जेव्हा निर्मात्यांनी राजची भूमिका सैफ अली खानला देण्याचा विचार केला होता. जेव्हा शाहरूख खान तयार झाला तेव्हा तो करन-अर्जुन सिनेमाचं शूटींग करत होता. (DDLJ @25 काजोल- शाहरूखच्या सोशल मीडियावरील फोटोने वेधले लक्ष, एकदा पाहाच)
तेच सिनेमाची मुख्य भूमिका सिमरनचा रोल काजोलला फारच बोरिंग वाटत होता. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, 'मला वाटतं सर्वांमध्ये सिमरनची एकना एक खासियत असतेच. अनेक लोक ते करू शकत नाहीत. पण त्यांना करायचं नक्की असतं. तुम्हाला केवळ एका अप्रूव्हलची गरज असते. सिमरन अशीच होती मला वाटतं सिमरन फार ओल्ड फॅशन असली तरी कूल होती.