Join us  

अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले

By मनोज गडनीस | Published: June 18, 2024 8:37 PM

Abhishek Bachchan Trending News: घर खरेदीत बॉलीवूड कलाकार देखील मोठ्या प्रमाणावर सामील झाले असून या बॉलीवूड कलाकारांच्या या यादीत आता अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील नंबर लावला आहे.

मुंबई - मुंबईत गेल्या दीड वर्षांपासून जोमाने सुरू असलेल्या घर खरेदीत बॉलीवूड कलाकार देखील मोठ्या प्रमाणावर सामील झाले असून या बॉलीवूड कलाकारांच्या या यादीत आता अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील नंबर लावला आहे. अभिषेक बच्चन याने बोरीवली येथे १५ कोटी ४२ लाख रुपयांना सहा फ्लॅटची खरेदी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ओबेरॉय स्काय सिटी या आलीशान प्रकल्पात अभिषेक याने या फ्लॅटची खरेदी केली असून या सहा फ्लॅटचे एकत्रित आकारमान ४८९४ चौरस फूट असून या करिता अभिषेक याने प्रति चौरस फूटाकरिता ३१ हजार ४९८ रुपयांचा दर मोजला आहे. या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर हे सहा फ्लॅट असून यासोबत १० पार्किंग स्लॉट त्याला मिळाले आहेत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीयचं नेहमी चर्चेत असतं. अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला असून सध्या ते मुंबईत राहतात. मात्र अनेक ठिकाणी त्यांची घर, मालमत्ता आहे. राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी 14.5 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केला होता. आता एप्रिल महिन्यात पुन्हा अलिबाग येथे कोट्यावधी रुपयांची जमीन घेतली आहे. 

सियासतने दिलेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनच्या नावावर तब्बल ८०० कोटींची संपत्ती आहे. ऐश्वर्या बच्चन संपत्तीच्या बाबतीत प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, करीना कपूर, माधुरी दीक्षित यांना मागे टाकते.  ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्यांना आराध्याही मुलगी आहे. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्या पोनियन सेल्व्हन 2 (PS 2) सिनेमात दिसली होती.

ऐश्वर्याचं दुबईत आलिशान घर आहे. तिचं हे घर जुमैरा गोल्फ इस्टेटमधील सँक्च्युअरी फॉल्स याठिकाणी असल्याची माहिती आहे. हा परिसर दुबईतील सर्वात पॉश आणि महागडा परिसर मानला जातो. मात्र, यावर ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाकडून कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या घरात  अत्याधुनिक जिम, स्विमिंग पूलसह इतरही अनेक सोयीसुविधा आहे. या घराची तब्बल १५ कोटी रुपये इतकी किंमत असल्याचं बोललं जातं आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चनबांधकाम उद्योग