बॉयकॉट मिर्झापूर म्हणणाऱ्यांना अली फजलचं सडेतोड उत्तर, म्हणाला....
By अमित इंगोले | Published: October 9, 2020 03:35 PM2020-10-09T15:35:10+5:302020-10-09T15:43:39+5:30
ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याबाबत सोशल मीडियावर ट्रेन्ड सुरू झाला. याबाबत या वेबसीरीजमध्ये गुड्डू पंडीतची भूमिका साकारणारा अभिनेत अली फजलने प्रतिक्रिया दिली आहे.
'मिर्झापूर' या लोकप्रिय वेबसीरीजचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याबाबत वेगवेगळी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नुकताच मिर्झापूर २ चा ट्रेलर रिलीज झाला होता. २३ ऑक्टोबरपासून लोक ही वेबसीरीज बघू शकणार आहेत. अशात ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याबाबत सोशल मीडियावर ट्रेन्ड सुरू झाला. याबाबत या वेबसीरीजमध्ये गुड्डू पंडीतची भूमिका साकारणारा अभिनेत अली फजलने प्रतिक्रिया दिली आहे.
अली फजलचं म्हणणं आहे की, आपण ट्रेंडच्या दयेवर आहोत का? टाइम्स नाउ डिजीटलसोबत बोलताना अली म्हणाला की, 'आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की, आपली बाजू काय आहे. काय आपण ट्रेंडच्या दयेवर जिवंत आहोत. नाही. मी कोणत्याही कलेकडे त्या दृष्टीने बघत नाही. आपण केवळ एका अॅपच्या भरोश्यावर आहोत का की, आपण हा निर्णय घ्यायचा की आपला शो कोण बघणार आणि कोण नाही. नाही. मला वाटतं या गोष्टी आता खाली आल्या आहेत'. (Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य...)
अली म्हणाला की, जर तुम्ही ट्रेंडबाबत बोलाल तर मी कधीच नाही पाहिलं की, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे ट्रेंडमध्ये आलेत. देशात सगळीकडे शेतकऱ्यांची आंदोलने झालीत. मला वाटतं की, आता लोकांनी ट्रेंडसारख्या गोष्टींच्या पलिकडे बघण्याची गरज आहे.
दरम्यान, सीएए आणि एनआरसीसारख्या मुद्द्यांवर अली आणि वेबसीरीजचा निर्माता फरहान अख्तरने आवाज उठवला होता. या विरोधात वक्तव्ये केली होती. याच कारणामुळे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत आणि वेबसीरीज बॉयकॉट करण्याचाी मागणी करत आहेत.
पहिल्या सीझनमध्ये गाजलेल्या या वेबसीरीजमध्ये अली फजलसोबतच, पंकज त्रिपाठी दिवेन्दू शर्मा, विक्रांत मेसी, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गलसारखे कलाकारही आहे. हा शो उत्तरप्रदेशातील मिर्झापूर आणि तेथील खानदानावर आधारित आहे.