दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत
By तेजल गावडे | Published: October 8, 2020 12:31 PM2020-10-08T12:31:54+5:302020-10-08T12:34:43+5:30
अभिनेता संजय दत्त दुबईहून मुंबईत आला आहे आणि त्याच्या किमोथेरपीचा तिसरा सेशन सुरू झाले आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त दुबईहून मुंबईत आला आहे आणि त्याच्या किमोथेरपीचा तिसरा सेशन सुरू झाले आहे. संजय दत्त काही दिवसांपूर्वी दुबईत होता. त्याला चौथ्या स्टेजचा कर्करोग झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र असे वृत्त आहे की तो उपचारासाठी न्यूयॉर्कदेखील जाऊ शकतो. नुकताच त्याचा आणखीन एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात तो खूप कमकुवत वाटतो आहे. व्हायरल फोटोत तो मोबाईल वापरताना दिसतो आहे. त्याची बिघडलेली अवस्था पाहून सगळेच चिंतेत पडले आहेत. त्याचे चाहते त्याला लवकर बरे वाटावे, म्हणून प्रार्थना करत आहेत.
संजय दत्तचा समोर आलेल्या फोटोत त्याने ग्रे रंगाचा टीशर्ट आणि जिन्स घातली आहे. तो फोनवर काहीतरी करताना दिसतो आहे. त्याने काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. चेहऱ्यावर क्षीण दिसते आहे. त्याने दाढी देखील काढली आहे. त्यामुळे त्याचे गाल पिचकलेले वाटत आहेत.
संजय दत्तने ११ ऑगस्ट रोजी तब्येतीत बिघाड झाल्यामुळे काही काळ कामातून ब्रेक घेतो आहे. १८ ऑगस्टला संजय दत्तने पॅपराजीच्या समोर सांगितले होते की, त्याच्यासाठी प्रार्थना करा. किमोथेरेपीनंतर संजयची प्रकृती दिवसेंदिवस खालावताना दिसते आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्याची आणखीन किती किमो थेरेपी होईल हे सांगणे कठीण आहे.
संजय दत्तचा फोटो समोर आल्यानंतर त्याचे चाहते खूप चितेंत आहेत. एका युजरने फोटो पाहून म्हटले की बाबा खूप कमजोर दिसतो आहे आशा आहे की तो लवकर बरा होईल. आणखीन एका युजरने सांगितले की, प्रार्थना करतो की संजूला लवकरच बरे वाटेल. एका व्यक्तीने लिहिले की, संजय दत्त खूप आजारी दिसतो आहे. त्याचे वजनदेखील कमी झाले आहे. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, तुम्ही फायटर आहात, लवकरच बरे वाटेल.
संजय दत्तवर उपचार डॉ. जलील पारकर करत आहेत. डॉ. जलील यांनी किमो थेरपीची पहिली स्टेप पूर्ण झाल्यावर सांगितले होते की किमोथेरेपी सोप्पी नसते आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संजय दत्तचा सामना खूप कठीण ठरणार आहे. त्याचे बरेच साइड इफेक्ट्सदेखील आहेत. लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांनी संजय दत्तच्या फुफ्फुसामधून जवळपास दीड लीटर फ्लूइड काढले होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या फुफ्फुसात सारखे फ्लूइड जमा होत आहे. ज्यामुळे त्याला जास्त त्रास होतो आहे.
भलेही संजय दत्त फुफ्फुसाच्या कर्करोगाशी सामना करत आहे पण उपचारासोबत चित्रपटाच्या शूटिंगकडेही लक्ष केंद्रीत करत आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचे शमशेरा, केजीएफ २, पृथ्वीराज, भुजः द प्राइड ऑफ इंडिया आणि तोरबाज चित्रपटाचा समावेश आहे. यातील काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहे तर काहीचे काम बाकी आहे.