बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीत ११ टक्क्यांची वाढ; पोलिसांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:30 AM2021-02-01T11:30:50+5:302021-02-01T11:33:20+5:30

Buldhana Police News जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे.

11% increase in crime in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीत ११ टक्क्यांची वाढ; पोलिसांची संख्या कमी

बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीत ११ टक्क्यांची वाढ; पोलिसांची संख्या कमी

Next
ठळक मुद्देहजार व्यक्तीमागे जिल्ह्यात अवघा एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे.२,७३२ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात २६०० पोलीस कर्मचारीच कार्यरत.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे. त्यातच २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जिल्ह्यात ११ टक्क्यांनी गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. परिणामी, जिल्ह्याची लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात येत्या काळात  दोन टप्प्यात १२,५०० पोलिसांची भरती होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. 
बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात असून प्रतिएक हजार व्यक्तीमागे जिल्ह्यात अवघा एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नैसर्गिक आपत्ती, निवडणुका व तत्सम कालावधीत पोलिसांवर मोठा ताण येतो. गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गामुळेही पोलिसांवर चांगलाच ताण आलेला आहे. काही पोलीस कर्मचारीही त्यामुळे प्रभावीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा पोलीस दलात २,७३२ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात २६०० पोलीस कर्मचारीच कार्यरत आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षकांची संख्या ही ११९ हवी असताना प्रत्यक्षात ३३ पोलिस उपनिरीक्षक जिल्ह्यात कमी आहेत. पोलीस निरीक्षकांचीही संख्या जिल्ह्यात कमी आहे. त्यामुळे नियमित कामांव्यतिरिक्त अन्य कामे सांभाळून गुन्हेगारीला आळा घालताना पोलिसांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे शहरी तथा ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार किती पोलिस हवे याचे निकष वेगवेगळे आहे. मात्र आता १९६१ मधील अनुषंगीक निकष बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस दलाकडून कम्युनिटी पोलिसिंगचेही सहकार्य बुलडाणा पोलिस दल घेत आहे. त्या माध्यमातून  जनमानसामध्ये पोलिसांविषयी एक विश्वास निर्माण होऊन गुन्हे रोखण्यास त्याची मदत होत आहे. जिल्हयात पोलिस दलात अधिक सुसुत्रा येण्यासाठी दोन उपविभाग निर्मितीचे प्रस्ताव आहेत.


तुलनेने कमी मनुष्यबळ असले तरी जबाबदारी निश्चित करून गुणात्मक काम करण्यास जिल्हा पोलीस दल प्राधान्य देत आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मधल्या काळात दंगाकाबू पथकाचे पुनर्गठन करण्यात येवून पोलीस दलातील वातावरण मैत्रिपूर्ण ठेवण्यास व पोलिसांचा ताण कमी करण्यास आपण प्राधान्य दिले आहे. यासोबतच वाहनावरील चालकांची रिक्तपदेही भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वाहनांसाठी नवीन टायरचीही मागणी केलेली आहे.
- अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा

Web Title: 11% increase in crime in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.