खामगावातील १५ गणेश मंडळांना ना-हरहत प्रमाणपत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 03:34 PM2019-08-30T15:34:23+5:302019-08-30T15:34:51+5:30
गणेशोत्सव काळात मंडप उभारणीसाठी १५ गणेश मंडळांना खामगाव पालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
प्रमाणपत्रासाठी गणेश मंडळांनी अर्ज करावे; पालिकेचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गणेशोत्सव काळात मंडप उभारणीसाठी १५ गणेश मंडळांना खामगाव पालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. गणेश मंडळाकडून प्राप्त झालेल्या विविध गणेश मंडळाचे अर्ज पालिकेने निकाली काढलेत. दरम्यान, इतर गणेशोत्सव मंडळांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहराच्या विविध भागातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना गणेशोत्सव काळात मंडप उभारणीसाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. रहदारीस अडथळा होणार नाही, अशी हमी देणाºया तसेच इतर बाबींची पूर्तता करणाºया गणेशोत्सव मंडळांना पालिकेच्या भूमी विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. यावर्षी २३ ते २९ आॅगस्टपर्यंत अर्ज सादर करणाºया १५ गणेशोत्सव मंडळांना नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. यामध्ये वंदेमातरम नवयुवक मंडळ गांधी चौक, रामदल गणेशोत्सव मंडळ शिवाजी वेस, क्रांती मंडळ आठवडी बाजार, हिंदू सुर्य राणा मंडळ दाळफैल, जय सियाराम गणेश मंडळ वामननगर, स्वामी विवेकानंद गणेश मंडळ फरशी, संगत गणेशोत्सव मंडळ सराफा, सिंधी नवयुवक मंडळ सिंधी कॉलनी, ओम गणेशोत्सव मंडळ अमृतनगर, हनुमान गणेशोत्सव मंडळ सतीफैल, नेताजी गणेशोत्सव मंडळ बारादरी, बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ, अमरलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ बालाजी प्लॉट, जगदंबा गणेशोत्सव मंडळ बाळापूर फैल या मंडळांचा समावेश आहे.