'लाल'परीच्या १५ हजारा फेऱ्या तोट्यात; एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:45 PM2019-01-09T15:45:30+5:302019-01-09T15:45:35+5:30
खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक बाब एसटीच्या एका अहवालातून पुढे आली आहे.
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक बाब एसटीच्या एका अहवालातून पुढे आली आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असलेल्या एसटी महामंडळाची 'लालपरी' महाराष्ट्र राज्यातील अनेकांचे प्रवासाचे मुख्य साधन आहे. शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा दुवा म्हणूनही एसटीकडे पाहण्यात येते. तर दुर्गम आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठीही एसटीच धावून जाते. राज्यातील ३७ हजार ४१७ खेड्यांपैकी जवळपास ९० टक्के भागांमध्ये एसटीकडून प्रवासी सेवा पुरविली जाते. मात्र, ही सेवा देताना महामंडळाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाकडून फायदा आणि तोट्यातील फेऱ्यांचे वर्गीकरण केले जाते. यात अ-वर्गातील फेऱ्या म्हणजे, फायद्यातील फेऱ्या, ब-वर्गातील फेऱ्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या तर क-वर्गातील फेऱ्या या पूर्णत: तोट्या चालणाऱ्या फेऱ्या आहेत. एसटी महामंडळाकडून सध्या ज्या फेऱ्यांना प्रतिसाद नाही अशा फेऱ्या बंद केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील फेºया तोट्यात असल्या तरी, , सामाजिक बांधिलकी म्हणून महामंडळाकडून या फेऱ्या चालविल्या जात असल्याची माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
सक्तीची 'बंधनकारक' सेवा अडचणीची!
राज्यातील ९५ टक्के भागात एसटी महामंडळाकडून प्रवासी सेवा दिली जाते. यामध्ये ग्रामीण भागात खासकरून दुर्गम भागात प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या चालविण्यात येतात. यामध्ये लोकप्रतिनिधींच्या दबावातून आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही बंधनकारक फेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक फऱ्यांमुळे एसटीला तब्बल २५० कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
नफा निहाय फेऱ्यांची वर्गवारी!
महामंडळाच्या दररोज एकूण ९७ हजार ६00 फेºया धावतात. यातील अ-वर्गात २४ हजार ७00 फेºयांचा समावेश आहे. तर ब-वर्गात ५७ हजार ९00 फेºयांचा समावेश असून, क-वर्गातील या १४ हजार ९६0 फेºया आहेत. म्हणजेच एकूण फेºयांपैकी १४ हजार ९६0 फेºया हा पूर्णत: तोट्यातील आहेत. या फेºयांमुळे महामंडळाला वर्षाला २५0 कोटींचा तोटा सहन करावा लागतो.