अडीच लाख भाविकांची महापंगत, १५१ क्विंटल पुरीभाजीसह महाप्रसादाचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 07:40 PM2019-01-27T19:40:15+5:302019-01-27T19:41:00+5:30

५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान सुमारे अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. यावेळी १५१ क्विंटल पुरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद वितरती करण्यात आला.

151 quintals Purabji for 2.5 lakh devotees | अडीच लाख भाविकांची महापंगत, १५१ क्विंटल पुरीभाजीसह महाप्रसादाचा लाभ

अडीच लाख भाविकांची महापंगत, १५१ क्विंटल पुरीभाजीसह महाप्रसादाचा लाभ

Next

हिवरा आश्रम -  ५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान सुमारे अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. यावेळी १५१ क्विंटल पुरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद वितरती करण्यात आला. राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांच्या ‘स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, शुकदास महाराज की जय’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. 
श्रीश्रीश्री महामंडलेश्वर बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते तर खासदार प्रतापराव जाधव,आ. डॉ. संजय कुटे, आ. डॉ. संजय रायमूलकर, आ. बळीराम सिरस्कर, महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले पाटील, जि. प. सदस्य संजय वडतकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थित महाप्रसाद वितरणास सुरुवात झाली होती. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, राष्ट्रवादी काँगे्रस मेहकर विधानसभा अध्यक्ष पुरूषोत्तम पाटील, भाजपच्या जेष्ठ नेत्या मंदाकिनी कंकाळ, रा. काँ. चे मेहकरचे तालुका अध्यक्ष गजानन सावंत, दत्ताभाऊ खरात, सामूहिक विवाहाचे प्रणेते शिवाजीराव नवघरे, राष्ट्रवादी किसान सेना जिल्हाध्यक्ष संपतराव देशमुख, सिंदखेड राजा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष  शिवदास रिंढे, जिजाऊ क्रांती सेनेचे संस्थापक अंबादास गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वºहाडे, उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, अ‍ॅड. साहेबराव सरदार, चिखलीचे नगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, भिमशक्तीचे नेते भाई कैलास सुखदाने, माजी जि. प. सदस्य मनिष शेळके, अरविंदराव वानखेडे, अ‍ॅड. विनोद नरवाडे, पं. स. सदस्या वर्षाताई मवाळ, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनकर कंकाळ, माजी जि. प. सदस्य विष्णु मगर, अ‍ॅड. किशोर धोंडगे, नंदाराम काळे, अ‍ॅड सतिष रोठे, एकनाथराव दुधे, माजी सभापती बबनराव लहाने, अमोल म्हस्के, सुरेशतात्या वाळूकर, प्रमोद रायमूलकर, मनोहर गि-हे, प्रा. प्रशांत पडघान, विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत, विवेक घळसासी, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जवंजाळ, मधुकर गवई, अ‍ॅड. किशोर धोंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी संचलन केले. त्यांनी शंखध्वनीसह स्वामी विवेकानंद व शुकदास महाराज यांच्या नावाचा जयघोष केला. विवेकानंद आश्रमाचे प्रसारमाध्यम सल्लागार पुरुषोत्तम सांगळे, विश्वस्त अ‍ॅड. किशोर धोंडगे, पुरुषोत्तम अकोटकर, प्रा. कैलास भिसडे, नारायण भारस्कर, अशोक गिºहे, शशिकांतअप्पा बेंदाडे, पंढरीनाथ शेळके, संजय भारती, शिवदास सांबपूरे, वसंतआप्पा सांबपूरे, विजय भोरे, यांच्यासह आश्रमाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी यांनी सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक राणे व त्यांच्या सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 
१०१ ट्रॅक्टरद्वारे महाप्रसाद वितरण
या महापंगतीमध्ये सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवित ५० एकराच्या परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या होत्या. १०१ ट्रॅक्टरद्वारे व चार हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुंकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले. 
 
विद्यार्थ्यांचा पुढाकार
राज्यातील एकमेव ठिकाणी एवढ्या भव्य महाप्रसाद वितरीत करण्याकरीता विवेकानंद कृषी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, ज्युनियर कॉलेजच्या मुलीनी महीलांच्या पंगतीला महाप्रसाद वितरीत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

Web Title: 151 quintals Purabji for 2.5 lakh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.