लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सध्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची जिल्हयात लगबग सुरू असतानाच गेल्या दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात १५ तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.एकीकडे बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेकºयांना एक हजार ४०० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर वर्तविल्याजात असतानाच गत दोन महिन्यात १७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. या आत्महत्यांमागील कारणे वेगवेगळी असली शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीदरम्यानच या शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भाती फेब्रुवारी महिन्याचा अहवाल अद्याप अंतिम झालेला नाही. मात्र जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील खरीपाचे पिकच उद्धवस्त झाले होते. त्यामध्ये जवळपास ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अवघ्या ११ दिवसात २१८ टक्के परतीचा व अवकाळी पाऊस त्यावेळी पडला होता. त्या दरम्यानही दीड महिन्यात २३ शेतकºयांनी आपली जिवन यात्रा संपवली होती. दरम्यान, त्यावेळी झालेल्या नुकसानाची रक्कमच आता टप्प्या टप्प्याने शेतकºयांना मिळाली आहे. सोबतच शेतकरी कर्जमाफी योजनेच्या याद्याही आता पोर्टलवर झळकत आहे. अशा स्थितही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.
अवकाळी पावसानंतर ६३ आत्महत्याआॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये पडलेल्या परतीच्या व अवकाळी पाऊस पडल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१९ ते २२ फेब्रुवारी २०२० दरम्यानच्या तीन महिन्यात ६३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी काही मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.
१९ वर्षात २,९८५ आत्महत्याजिल्ह्यात २००१ या वर्षापासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. सोबतच मृत शेतकºयाच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदत दिल्या जात आहे. तेव्हापासून आजपर्यंतचा विचार करता जिल्ह्यात १९ वर्षात दोन हजार ९८५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी १,५५० शेतकºयाच्या आत्महत्या या मदतीस पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी १,३९४ मृतशेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे.