- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिधापत्रिका पत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सदस्यांची आधार जोडणी आणि ई-केवायसी प्रलंबित असलेल्या १८ हजार शिधापत्रिका आगामी काळात रद्द ठरणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात एकूण चार लाख ८८ हजार ९५१ शिधापत्रिका आहेत. दरम्यान, गत पाच महिन्यात एकदाही धान्याची उचल न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी शोध मोहीम राबविण्यात येत असतानाच, आधार जोडणी आणि इतर कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल १८ हजार १४३ शिधापत्रिका (५६६७३) युनिट बाद करण्यात येणार आहेत.अपात्र, बोगस, अनिच्छुक आणि एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सर्वच शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.खामगाव तालुक्यात सर्वाधिक शिधापत्रिकाबाद होणाऱ्या शिधापत्रिकांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सर्वाधिक शिधापत्रिकांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यात २३३५ इतक्या शिधापत्रिका बाद होणार आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार शिधापत्रिकांवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 11:03 AM