एकंदरीत कोरोना बाधितांवरील उपचारासाठी बुलडाण्यात अन्य ठिकाणच्या तुलनेत अधिक सुविधा उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांसह लक्षणे असलेल्या रुग्णांचा बुलडाणा शहराकडे अधिक ओढा आहे. त्यामुळे तालुकास्तरावरून बुलडाण्याला रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या अधिक असल्याचे सामान्य रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक प्रवीण उमाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
--बुलडाण्यातील रुग्णालय आणि बेडची संख्या--
अ. क्र. रुग्णालय बेड संख्या उपलब्ध बेड
१) कोविड समर्पित रुग्णालय २०० ०६
२) लद्धड हॉस्पिटल ४५ ०३
३) सहयोग हॉस्पिटल २५ ०३
४) आशीर्वाद हॉस्पिटल ५० २७
५) शिवसाई हॉस्पिटल ३० २४
६) काटकर हॉस्पिटल १३ ००
७) निकम हॉस्पिटल २० ०५
८) जाधव हॉस्पिटल १५ ०२