२५९ युवकांनी रक्तदान करून केले शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:39+5:302021-03-26T04:34:39+5:30
बुलडाणा : शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ९० व्या शहीद दिनानिमित्त २३ मार्च रोजी देशव्यापी रक्तदान महाशिबिराचे आयोजन ...
बुलडाणा : शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ९० व्या शहीद दिनानिमित्त २३ मार्च रोजी देशव्यापी रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त गर्दे वाचनालयाच्या सभागृहात २५९ दात्यांनी रक्तदान करून या वीर शहिदांना अभिवादन केले.
निमा संघटना, आम्ही बुलडाणेकर, आयुर्वेद मेडिकल कॉलेज, आदिती अर्बन, जिल्हा पत्रकार संघ, शिवजागर मंच, लेवा पाटीदार युवा मंच, राजर्षी शाहू पतसंस्था, संत रविदास सेवा समिती, शिवशक्ती ग्रामीण पतसंस्था, स्व. संतोषराव काळे सेवा मंडळ, दुधा, गर्दे वाचनालय आदी सेवाभावी संस्थांच्या वतीने या संवेदना भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात विविध स्तरांतील नागरिकांनी रक्तदान करून बुलडाणेकरांची संवेदना जागृत केली आहे. सर्वप्रथम प्रशांत इंगळे यांनी रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद दिला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रक्तसंकलनाचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय, जीवनधारा ब्लड बँक व लीलावती ब्लड बँक यांच्या चमूने केले.
गर्दे वाचनालय परिवाराने रक्तदान संवेदना शिबिराला मोफत सभागृह देऊन रक्तदात्यांची बसण्याची व्यवस्था केली. या कार्यात उदय देशपांडे, अॅड. अमोल बल्लाळ, ग्रंथपाल नेमीनाथ सातपुते यांच्या चमूने संपूर्ण शिबिरात विशेष सहकार्य केले, तसेच कारागृह अधीक्षक अरविंद आवळे, चालक बबन खंडारे व कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान केले. महिला फोरमच्या डॉ. वैशाली पडघान, डॉ. माधवी जवरे, मनीषा शिंगणे, साधना ढवळे, पुष्पा गायकवाड, सुवर्णा देशमुख, श्रीमती जोशी यासह तीस महिलांनी रक्तदान केले.
शिबिरासाठी संवेदना महारक्तदान शिबिराचे संयोजक डॉ. राजेश्वर उबरहंडे, मार्गदर्शक डॉ. गजानन पडघान, निमा जिल्हाध्यक्ष दिनेश अग्रवाल, डॉ. प्रशांत ढोरे, डॉ. अजय खर्चे, डॉ. रवींद्र वाघमारे, डॉ. प्रवीण पिंपरकर, डॉ. राखी कुळकर्णी, डॉ. वैशाली पडघान, संजय खांडवे, सागर काळवाघे, प्रशांत खाचणे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, डॉ. आशिष मुळे, डॉ. कांचन अंभोरे, सुरेश देवकर, डॉ. भागवत वसू, डॉ. प्रमोद डव्हळे, तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिराला आयएमएचे डॉ. शोन चिंचोले, डॉ. विकास बाहेकर, कारागृह अधीक्षक अरविंद आवळे, माजी आ. विजयराज शिंदे, अॅड. जयसिंग देशमुख, पत्रकार संघाचे सरचिटणीस नितीन शिरसाट, जगदेवराव बाहेकर, डाॅ. छाया महाजन, नगरसेवक अरविंद होंडे, दीपक सोनुने, अंजली परांजपे, गायत्री सावजी, सुवर्णा देशमुख, मंदार बाहेकर, दामोदर बिडवे, डी.आर. माळी, संदीप शेळके, विनोद बेंडवाल यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.