२७ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली राज्यसेवा परीक्षेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:23+5:302021-03-23T04:37:23+5:30

एमपीएससीची १४ मार्च राेजी हाेणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली हाेती. आयाेगाने ही परीक्षा २१ मार्च राेजी ...

27% students turn to state service exams | २७ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली राज्यसेवा परीक्षेकडे पाठ

२७ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली राज्यसेवा परीक्षेकडे पाठ

Next

एमपीएससीची १४ मार्च राेजी हाेणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली हाेती. आयाेगाने ही परीक्षा २१ मार्च राेजी घेण्याची घाेषणा केली हाेती. काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता यावेळी विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढली आहे. दरवर्षी १० टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहत हाेते. यावर्षी परीक्षांचा सुरू असलेला गाेंधळ पाहता अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. जिल्ह्यातील १ हजार ४३२ विद्यार्थी अनुपस्थित हाेते. परीक्षा केंद्रावर काेराेनाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आली हाेती, तसेच एमपीएससीच्यावतीने विद्यार्थ्यांना हातमाेजे, सॅनिटायझरचे पाउच आणि मास्क उपलब्ध करून दिले हाेते, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या शरीराचे तापमान माेजल्याशिवाय प्रवेश देण्यात येत नव्हता. काेराेना संसर्गाच्या दृष्टीने आयाेगाने खबरदारी घेतली हाेती.

Web Title: 27% students turn to state service exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.