संदीप वानखडे
बुलडाणा : खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत अवघी दहा दिवस राहिली असतानाच जिल्ह्यातील २९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे़ खरीप हंगाम संपत आला असला तरी ४१ हजार ३९९ शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही़ यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचे रिन्यूव्हल केले नसल्याने नवीन पीक कर्ज मिळालेले नाही.
निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे़ गेल्या वर्षी शासनाने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले हाेते़ त्यानंतर कर्जाचे पुनर्गठण व नूतनीकरण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले हाेते़ त्यापैकी आतापर्यंत ९८ हजार ६०१ शेतकऱ्यांना ९२३ काेटी ३१ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे़ अजूनही २९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही़ ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज घेण्याची मुदत आहे़ त्यानंतर रब्बी पीक कर्ज वितरण सुरू हाेणार आहे़
कर्जमाफीचा घाेळ सुरूच
अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे़ काही शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत नसल्याने अडचणी येत आहेत़ अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठणही झाले नाही़ तसेच पीक कर्जापासून बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचे रिन्यूव्हल केले नाही़ त्यामुळे, त्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे़
बँक ऑफ इंडिया आघाडीवर
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडिया आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या बँकेने २५०० शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले. तसेच युनियन बँकेने ९२ टक्के, सेंटल बँक ऑफ इंडियाने ८२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ८१ टक्के पीक कर्ज वाटप केले हाेते.
गेल्या वर्षी १२५५ काेटींचे कर्ज वाटप
गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १२५५ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले हाेते. यावर्षी १३ सप्टेंबरपर्यंत ९२३ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
अनेक बँकांनी पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढले आहेत. काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे रिन्यूव्हल केले नसल्याने त्यांना नवीन कर्ज मिळालेले नाहीत़ ३० सप्टेंबर राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहेत़
नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅक, बुलडाणा
बँक ऑफ इंडिया आघाडीवर
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडिया आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या बँकेने २५०० शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले. तसेच युनियन बँकेने ९२ टक्के, सेंटल बँक ऑफ इंडियाने ८२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ८१ टक्के पीक कर्ज वाटप केले हाेते.
गेल्या वर्षी १२५५ काेटींचे कर्ज वाटप
गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १२५५ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले हाेते. यावर्षी १३ सप्टेंबरपर्यंत ९२३ काेटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
१४००००
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य
१३००००
लाखांचे हाेणार आहे वितरण
९८६०१
शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज
९२३३१
रुपयांचे कर्ज झाले वितरीत