काेलारा येथे ३२८ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:41+5:302021-04-20T04:35:41+5:30
पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी बुलडाणा : पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कडक उन्हाळा पाहता, चांडाेळ ...
पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी
बुलडाणा : पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कडक उन्हाळा पाहता, चांडाेळ येथे रमजान महिन्यात पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नदीम शेख यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
लस घेणाऱ्यांसाठी वाहनाची साेय
सुलतानपूर : परिसरातील दिव्यांग, वयोवृद्ध व ज्यांना चालणे शक्य नाही, अशा नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी जि. प. सदस्या रेणुका वाघ यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपले खासगी वाहन उपलब्ध करून दिले आहे.
गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना लस द्या
बुलडाणा : गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे़. गॅस एजन्सीचे कर्मचारी कोरोनाला न घाबरता सिलिंडर घरपोच पोहोचविण्याचे काम अविरत करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व एजन्सी कर्मचाऱ्यांना कोविडची लस तातडीने देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे़
रमेश मुळे पुरस्काराने सन्मानित
बुलडाणा : मुळे अण्णा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रमेश अण्णा मुळे यांना माँ जिजाऊ जिल्हा भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून जानेफळ येथील श्री. सरस्वती विद्यालयात १४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद, बुलडाणाच्यावतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मजिप्राचे कर्मचारी सातव्या आयाेगापासून वंचित
बुलडाणा : अत्यावश्यक सेवेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी कोरोना महामारीच्या काळातही स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला शुद्ध पाणी पुरवत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून अजूनही सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. शासनाच्या या धोरणामुळे मजीप्रा कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
घरगुती मेस व्यवसाय आर्थिक संकटात
बुलडाणा : कोरोना काळात अनेक छोटे-छोटे घरगुती व्यवसाय डबघाईला आले आहेत. लॉकडाऊनमुळे गेली वर्षभर महाविद्यालय, शिकवणी वर्ग बंद असल्याने बाहेर गावचे विद्यार्थी आपापल्या गावी परत गेले आहेत. यामुळे कित्येक वर्षांपासून घरगुती मेसच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
७० जणांनी घेतली काेराेना लस
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीअभावी अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद पडली होती. दरम्यान, लसीचा पुरवठा झाल्याने अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येत असलेल्या येथील उपकेंद्रात १६ एप्रिल रोजी एकाचदिवशी सत्तर नागरिकांनी कोरोना लस घेऊन लसीकरण मोहिमेला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड
चिखली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, संस्थानचे विश्वस्त व जिल्हा प्रशासनाने रेणुका देवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मागीलवर्षीसुध्दा कोरोना संकटामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. सलग दुसऱ्यावर्षी यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड झाला आहे़
संचारबंदीत गावठी दारू विक्री वाढली
बुलडाणा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत विविध निर्बंध लादण्यात आले आहे़त तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे़. यामध्येही अनेक गावांमध्य गावठी दारू विक्री माेठ्या प्रमाणात हाेत असल्याचे चित्र आहे़.
संचारबंदी असतानाही ग्रामस्थांचा मुक्त संचार
बिबी : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे़ मात्र, ग्रामीण भागात अजूनही अनेकजण मुक्त संचार करीत असल्याचे चित्र आहे़. पाेलिसांनी दंडात्मक कारवाई करूनही अनेकजण विनाकारण फिरत असल्याचे चित्र आहे़.