चिखली : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक शि. प्र. मं. तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय चिखलीव्दारे करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते तर रामकृष्ण शेटे यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे.
अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गजानन जाधव राहणार असून यावेळी मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पवन मांडवकर तर स्वागताध्यक्ष का. प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे राहणार आहेत. संचालनाची जबाबदारी अधिवेशनाचे आयोजक समन्वयक सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ .प्रफुल्ल गवई तर आभाराची जबाबदारी डॉ. गजानन मुंडे यांच्याकडे सोविण्यात आली आहे. या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या अडचणी, अभ्यासक्रम, परीक्षा आदी विषयांवर चर्चा पार पडणार आहे. प्रथम सत्रात 'आभासी पद्धतीने मराठीचे अध्ययन एक समस्या व उपाय' या विषयावर गोवा विद्यापीठाचे प्रा. प्रमोद पवार विचार व्यक्त करतील. या सत्राचे अध्यक्षस्थान मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ममता इंगोले, संचालन डॉ. गोविंद गायकी तर आभार प्रा. विजय वाकोडे करतील. दुसऱ्या सत्रात 'कोविड काळात परीक्षेची आवश्यकता व कार्यपद्धती' या विषयावर वक्ते म्हणून डॉ. संजय करंदीकर महाराजा सयाजी विद्यापीठ बडोदा हे प्रकाश टाकतील तर अध्यक्षस्थान डॉ. अलका गायकवाड भूषवतील. संचालन डॉ. विलास भवरे तर आभार डॉ. सुवर्णा गाडगे मानतील. समारोपीय सत्रात डॉ. मनोज तायडे आपले मनोगत व्यक्त करतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शि.प्र.मं.चे सचिव प्रेमराज भाला राहतील. या अधिवेशनात नोंद करून सहभागी होण्याचे आवाहन आयोजक का. प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे, समन्वयक डॉ. प्रफुल्ल गवई, म. प्रा. परिषदेचे अध्यक्ष डॉ. पवन मांडवकर, सचिव डॉ. राजू आदे व आयोजन समिती सदस्य डॉ. केदार ठोसर, डॉ. प्रदीप बारड, प्रा. विजय वाकोडे, डॉ. बाळकृष्ण इंगळे, डॉ. नागेश गायकवाड यांनी केले आहे.