बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़ साेमवारी केवळ चार संदिग्ध रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच दाेघांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ ३५८ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दे.राजा शहरातील सिव्हिल कॉलनी १, दे. राजा तालुका गव्हाण १, जवळखेड १, परजिल्हा सगड, ता. बाळापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे़ दाेघांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़
त्याचप्रमाणे आजपर्यंत ७ लाख १० हजार ८६४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी ६९१ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ५४८ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ८६ हजार ८४७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडचे २८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे़
रविवारी तिघांची काेराेनावर मात
रविवारी जिल्ह्यातील तिघांनी काेराेनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ तसेच खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळला आहे़ १०७९ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़