बुलडाणा जिल्ह्यातून १३ चिमुकल्यांसह ४५० मजूर उत्तर प्रदेशसाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:45 AM2020-05-21T10:45:31+5:302020-05-21T10:45:39+5:30
उत्तर प्रदेशसाठी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा बुलडाणा जिल्ह्यातून ४५० मजूर श्रमिक एक्सप्रेसने रवाना झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: उत्तर प्रदेशसाठी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा बुलडाणा जिल्ह्यातून ४५० मजूर श्रमिक एक्सप्रेसने रवाना झाले आहे. या मजुरांसोबत १३ लहान मुलेही होती.
अमरावती येथून उत्तर प्रदेशातील लखनऊसाठी २० मे रोजी सायंकाळी पाच वाजता ही रेल्वे सोडण्यात आली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातील उत्तर प्रदेशमधील मजूर अमरावती येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे सोडण्यात आले. बुलडाणा येथून दहा बस या मजुरांना अमरावती येथे सोडण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी बुलडाणा बसस्थानक सुरू झाले की काय? असे चित्र निर्माण झाले होते. चिखली येथून ८९, देऊळगाव राजातून २६, खामगावमदून ५७, मेहकरमधून ४५, शेगावमधून २२ व अन्य तालुक्यातून आठ, नऊ व काही ठिकाणाहून अवघे दोन मजुरांना अमरावती येथे बसद्वारे पाठविण्यात आले. सायंकाळी पाच वाजता ही बस लखनऊसाठी रवाना झाली होती
पाच अधिकाऱ्यांवर होती जबाबदारी
उत्तर प्रदेशातील या मजुरांना अमरावती येथे पोहोचविण्याची जबाबदारी एसडीओ राजेश्वर हांडे यांच्याकडे होती तर त्याचे संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी डीपीओ विजय शिंदेंकडे होती.