स्थानिक तहसील कार्यालयामध्ये आ. डाॅ. संजय रायमुलकर यांनी २२ एप्रिल रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी बेडची कमतरता असल्याने १०० बेड देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यापैकी ५० बेड कोविड सेंटरला देण्यात आले. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये होत चाललेली वाढ, यामुळे अपुरी पडणारी बेडची संख्या लक्षात घेता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आ. डाॅ. संजय रायमुलकर यांच्यातर्फे ५० बेड देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, निरज रायमुलकर, तहसीलदार सैपन नदाफ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, डाॅ. फिरोज शहा, नगरसेवक डाॅ. अनिल मापारी, सरपंच भगवान कोकाटे, युवासेना शहरप्रमुख गजानन मापारी, कोविड सेंटरचे व्यवस्थापक डाॅ. भाष्कर मापारी, पिंनू मापारी, माजी शहर प्रमुख अशोक वारे, राजू बोरा, डाॅ. निखिल आग्रवाल, रफीकभाई, गोडसे उपस्थित होते.
लोणार येथील कोविड सेंटरला ५० बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:15 AM