खामगाव सामान्य रूग्णालयाला ५० लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:31 PM2020-03-31T12:31:04+5:302020-03-31T12:31:10+5:30
आमदार आकाश फुंडकर यांनी पुर्ण निधी रु ५० लाख सामान्य रुग्णालय खामगावला वर्ग केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सामान्य रुग्णालयाला ५० लाख रूपयांचा निधी वर्ग केला आहे.
आमदार आकाश फुंडकर यांनी सद्याची कोरोगा विषाणु जन्य परिस्थिती पाहता. खामगांव येथील सामान्य रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयासाठी २१००० मास्क, अत्याधुनिक व्हेंटिलेटर २, पीपीइ किट ५००, थर्मल स्कॅनर ५ , मॉनिटर टेबल ५,इन्फेशन पंप ५, फ्लोअर बेड ५ , ह्यासह अल्कोहोल बेस हँड रब १५०० हे खरेदी करण्यासाठी निधी वर्ग केला आहे. मतदार संघातील प्रत्येक नागरिक हा स्वस्थ व सुरक्षित राहावा ह्यासाठी हा निधी वर्ग करण्याबाबत पत्राद्वारे नियोजन विभागाला कळविण्यात आले आहे,जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस मुळे जर विपरित परिस्थिती निर्माण झाली, तर सामान्य रुग्णालय खामगाव येथे आवश्यक सुविधा उपलब्ध राहाव्या ह्यासाठी आमदार आकाश फुंडकर यांनी पुर्ण आस्थावि निधी रु ५० लाख सामान्य रुग्णालय खामगावला वर्ग केला आहे. त्यातून लवकरच सामान्य रुग्णालय खामगाव ला कोराना बाधितांसाठी अत्यावश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होणार आहे.