५0 मचाणांवरून होणार टेहळणी
By admin | Published: May 4, 2015 01:13 AM2015-05-04T01:13:54+5:302015-05-04T01:13:54+5:30
दिन विशेष; आज होणार वन्यजीव गणना.
खामगाव : वन्यजीवप्रेमींना खुणावणारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची गणना रविवारी होणार असून, ज्ञानगंगा अभरण्यात ५0 मचाण टेहळणीसाठी उभारण्यात आले आहेत. ८ नैसर्गिक पाणवठय़ांसह २८ कृत्रिम पाणवठय़ांवर ही गणना होईल. वन्यजीव विभाग व वनविभाग या दोन्ही खात्यातर्फे केल्या जाणार्या या गणनेत दरवर्षी निसर्गप्रेमींना सामील केले जाते. दरवर्षी हौशी निसर्गप्रेमींची संख्या वाढतच आहे. मात्र अनेकांकडून कळत-नकळत जंगलाचे नियमांचे उल्लंघन होऊन गणनेत अडथळा निर्माण होतो. मनुष्याच्या हालचाली, कपडे, आवाजाची चाहूल आल्याने प्राणी पाणवठय़ावर येणे टाळतात, त्यामुळे प्राणी गणनेसाठी अडचणी येतात. त्यामुळे वन्यप्रेमींनी काळजी घेणे आवश्यक आहे.