--योजनांचा १६.५ टक्के निधी वळती--
आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या निर्माणसाठी जिल्हा नियोजन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील १६.५ टक्के निधी हा गेल्या वर्षी आरोग्य क्षेत्रातील सुविधांसाठी खर्च केला गेला. त्यातून आता जिल्ह्यात चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.
--ब्लड बँकेत प्लाझ्मा काढण्याची सुविधा--
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्लड बँकेमध्ये प्लाझ्मा काढण्याची सुविधा नव्हती. त्यादृष्टीने येथे दुरुस्ती करून आनुषंगिक सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचालीही सध्या वेगावान झाल्या आहेत. अल्पावधीतच त्याचे दृश्य परिणाम समोर येतील. यासोबतच शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन सेंटरही उभे राहले आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात कोरोना संकटामुळे असलेल्या धावपळीसोबतच पायाभूत सुविधा निर्माणाचाही वेग वाढला आहे.
--आरोग्य क्षेत्रासाठी आणखी ८ कोटी ८२ लाख--
ऑक्सिजन रिफिलिंग, ऑक्सिजन टँक, पाइपलाइन, कोविड सेंटरसाठी जनरेटर, इन्व्हर्टर, ऑक्सिजन उपकरणे तथा रोगनिदानासाठी आणखी साहित्य खरेदीसाठी ८ कोटी ८२ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे २४ हजार ६६८ कोटी रुपये स्थूल उत्पन्न असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यांत आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याचे दिसून येत आहे.