बुलडाणा शहरात ७५ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:20+5:302021-04-14T04:32:20+5:30

साखरखेर्डा येथील एकाचा मृत्यू साखरखेर्डा : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच असून मंगळवारी एका ५५ वर्षीय पुरुष ...

75 positive in Buldana city | बुलडाणा शहरात ७५ पाॅझिटिव्ह

बुलडाणा शहरात ७५ पाॅझिटिव्ह

Next

साखरखेर्डा येथील एकाचा मृत्यू

साखरखेर्डा : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच असून मंगळवारी एका ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच आणखी दाेघांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़ परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गांभीर्य नसल्याचे चित्र आहे़

सिंदखेडराजात १७ पाॅझिटिव्ह

सिंदखेड राजा : शहर व तालुक्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून मंगळवारी आणखी १७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तालुक्यातील जळगांव २, दुसरबीड ३, बाळसमुद्र ३, वखारी ३, शेंदुर्जन येथील दाेघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़

नवाफैल येथील घरातून दारू जप्त

खामगाव : शहरातील नवाफैल येथे प्रकाश जवंजाळ याच्या घरी दारूचा साठा असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घरात छापा टाकून देशी व विदेशी दारु एकूण ४ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १० एप्रिलला दुपारी केली. त्यामुळे इतर विक्रेत्यांमध्ये धास्ती आहे.

तीन ट्रॅक्टरचालकांवर कारवाई

नांदुरा : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरचालकांवर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे मलकापूर विभागात गस्त घालत असताना नांदुरा तालुक्यातील खातखेडजवळ ही कारवाई केली.

महिलेचा विनयभंग

संग्रामपूर : एका ३५ वर्षीय महिला घरात एकटी असताना आरोपीने विनयभंग केला. ही घटना ११ एप्रिलला पळशी झाशी येथे घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी विक्रम राठी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

औषधांचा काळा बाजार थांबवा

बुलडाणा : कोरोना औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. या इंजेक्शनची मूळ किंमत ही १ हजार २०० रुपये असून ते ४ हजार रुपयांपेक्षाही जास्त किमतीत विकले जात आहे.

Web Title: 75 positive in Buldana city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.