शेतकऱ्यांची ८१ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील शहापूर येथे समोर आला. याबाबत तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी सुनिल हरीदास पारखडे या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, सागर पुरुषोत्तम मेतकर(३४) रा.शहापूर यांच्यासह गावातील शेतकऱ्यांकडून आरोपी सुनिल हरीभाऊ पारखडे याने मागील तीन वर्षात उधारीत शेतमाल खरेदी केला. ठराविक कालावधीत खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे उधारीचे पैसे दोन वर्ष वेळेत दिले. त्यामुळे यावर्षी देखील शहापूर येथील २० शेतकऱ्यांनी त्यातला उधारीने सोयाबीन, तुर, हरभर दिला आहे. मात्र पारखडे याने परस्पर हा शेतमाल परस्पर विकला. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे दिले नाही. त्याने एकूण ८१ लाख ५ हजार ८७४ रूपयांनी गावातील २० शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरुन खामगाव ग्रामीण पोलिसांनी सुनिल पारखडे रा. याच्याविरुध्द भादंवि कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.