बिहार येथील ८२ मजूर खामगाव येथून रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:15 PM2020-05-17T17:15:58+5:302020-05-17T17:16:09+5:30
८२ मजुरांना शनिवारी खामगाव येथून रवाना करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेगाव आणि खामगाव येथील विविध खासगी आस्थापना तसेच इतर ठिकाणी कामावर असलेल्या ८२ मजुरांना शनिवारी खामगाव येथून रवाना करण्यात आले. महसूल प्रशासनाने खामगाव येथून भुसावळपर्यंत चार एसटी बसेस या मजुरांना उपलब्ध करून दिल्या. तसेच पुढील प्रवासासाठी भुसावळ येथून तिकीट काढून दिले.
कोरोना संचारबंदीमुळे राज्यातील विविध ठिकाणी मजूर अडकले आहेत. खामगाव आणि शेगाव येथे अडकून असलेल्या ८२ मजुरांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आॅनलाईन परवानगी मागितली होती. त्यामुळे या मजुरांना शनिवारी सकाळी खामगाव येथून भुसावळसाठी रवाना करण्यात आले. फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करताना ८२ मजुरांसाठी ४ वेगवेगळ्या बसेस सोडण्यात आल्या. तहसीलदार डॉ. शीतलकुमार रसाळ, नायब तहसीलदार किटे, मंडळ अधिकारी सूर्यकांत सातपुते, व्ही.जी. कुळकर्णी, नितीन देशमुख, व्ही.डी. गावंडे यांनी बिहारच्या सर्वच मजुरांना भुसावळसाठी रवाना केले. तेथून त्यांना बिहार येथे जाण्याची व्यवस्था करून देण्यात आली. त्यानंतर विशेष रेल्वे हे मजूर आपल्या गावी रवाना झाले.