डोणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले कोरोना लसीकरण केंद्राला २४ मार्च रोजी तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी आकस्मिक भेट देऊन लसीकरण संदर्भात माहिती जाणून घेतली. यात एखाद्या वेळी लस घेणाऱ्यास काही झाल्यास कोणती उपाय योजना कराल याचे प्रात्याक्षिक समजून घेतले. यावेळी आरोग्य सेवक शिवशंकर बळी व आरोग्यसेविका गंगाताई घाटोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम झनक यांनी त्याविषयी सर्व माहिती दिली व त्यानंतर त्यांनी लसीकरणास येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी स्थानिक महसूल कर्मचारी ,ग्राम पंचायत कर्मचारी ,गावातील सूज्ञ नागरिक,स्वयंसेवी संघटना, जिल्हा परिषद शिक्षक यांनी सहकार्य करून लसीकरणा संबंधी लोकांच्या मनामध्ये असलेली शंका दूर करून ज्यांना नोंदणी करायची त्यांची नोंदणी करून द्यावी. ज्यांची नोंदणी झाली नसेल त्यांनी सरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. आरोग्य विभागाने नोंदणी करून त्वरित त्याच दिवशी लसीकरण करून लसीकरणाचा वेग वाढवावा.
- डॉ. संजय गरकल,तहसीलदार