हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू केलेल्या ‘आमचं गाव आमचा विकास’ या हि तकारक योजनेंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून शाश्वत ग्रामविकास होण्याच्या दृष्टिकोनातून भरघोस निधी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्या तील ८६९ ग्रामपंचायतींनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले होते. या व्हिजन डॉ क्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात ह प्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींच्या ग्रामविकासाने वेग घेतला आहे. महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली पंचायत समिती कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय आदी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था व या प्रणालीतील सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी संयुक्तपणे बुलडाणा जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींमध्ये ‘आपलं गाव, आपला विकास’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २२ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम घेऊन विकासाचा नियोजन आराखडा तयार करून पंचायत समितीकडे पाठविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात तीन दिवसांचा सूक्ष्म नियोजन कार्यक्रम राबविण्यात आला असून, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पशुसंवर्धन आदींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. सदर नियोजन आराखडा मंजूर झाल्यानंतर आतापर्यंत एकूण सात हप्त्यात १८0 कोटीपर्यंत निधी वितरित करण्यात आला आहे, त्यामुळे गाव विकासाने वेग घेतला असून, येणार्या काळात त्यांचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत. यासाठी गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पशुधन पर्यवेक्षक, आशा वर्कर, आरोग्य सेवक, सेविका, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, तलाठी, युवक-युवती गट, ग्रामसेवक, बचत गटातील सदस्य, अध्यक्ष, कृषी सहायक, जल सुरक्षक, मु ख्याध्यापक, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, वनपाल, स्वयंसेवक, ग्रामपंचायत सेवक, संगणक सेवक यांसह ग्रामपंचायतीच्या सर्व समित्यांचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
असा वाटप करण्यात आला गाव विकास निधीव्हिजन डॉक्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात हप्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यात पहिल्या हप्त्यात २७ कोटी ४ लक्ष ४४ हजार ६२३, दुसर्या हप्त्यात २६ कोटी ७६ लक्ष, तिसर्या हप्त्यात ३७ कोटी २६ लक्ष ६७ हजार ३४७, चवथ्या हप्त्यात ३७ कोटी ९ लक्ष २0 हजार ४८६, पाचव्या हप्त्यात ६ लक्ष १७ हजार तसेच सहाव्या हप्त्यात १३ कोटी ११ लक्ष ५४ हजार १४ रूपयाचा निधी वितरित करण्या त आला आहे. याशिवाय चांगले काम करणार्या ग्रामपंचायतींना यावर्षी प्रोत्साहन पर निधी म्हणून ९ कोटी ७२ लाख ६२५ रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गावातील विकास कामांनी वेग घेतला आहे.