लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेवर बलात्कार करणाºया आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला दहा वर्षांची शिक्षा देण्याचा आदेश मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ सप्टेंबर रोजी दिला. नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेने याप्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती. त्यानुसार आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याच्याविरूद्ध नांदुरा पोलिसांनी भादंविच्या विविध कलमासह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक करून तपास सपोनि सचिन शिंदे (मयत) यांनी केला. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला शिक्षा ठोठावली. त्यामध्ये १० वर्षांची शिक्षा व ५००० रु. दंड, तो न भरल्यास १ महिना कारावास, तसेच कलम ३७६ (अ) मध्ये ७ वर्ष सक्तमजुरी, ५००० रुपए दंड, कलम ४५२ अंतर्गत ५ वर्ष सक्तमजुरीसह विविध शिक्षा सुनावल्या आहेत. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश जोशी, व्ही.एम.बापट यांनी काम पाहिले.
बलात्कार प्रकरणी आरोपीला दहा वर्ष शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 8:08 PM